“राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे” अशी जाहिरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अनेक वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर दिल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रात अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या असून आता, “केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र”, या घोषणेचे काय झाले??, असा सवाल मराठी माध्यमांनी विचारला आहे. त्याच वेळी शिवसेना – भाजप युतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रोजेक्शन मुळे ठिणगी पडल्याचा दावाही माध्यमांनी केला आहे. पण प्रत्यक्षात ही शिवसेना-भाजप युती मध्ये खरंच ठिणगी पडली आहे की माध्यमांनीच या जाहिरातीचे निमित्त साधून राईचा पर्वत केला आहे??, हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे!! Shivsena – BJP alliance intact, no cracks; but marathi media ignite the flames
कारण 2024 ची निवडणूक शिवसेना – भाजप युती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीने जाहीर केले आहे. 7 – 8 दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नवी दिल्लीतल्या घरी झालेल्या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यामध्ये शिवसेना – भाजप युतीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. त्याच वेळी खरे म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना – भाजप युती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवेल, असे देखील स्पष्ट झाले.
पण ठाणे – कल्याण मतदार संघातल्या भाजपच्या एका कार्यक्रमामुळे आणि तिथल्या काही निवडक नेत्यांच्या भाषणामुळे युतीत बेबनाव झाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. त्या संदर्भातला स्पष्ट खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. महाराष्ट्रातले लोकसभा आणि विधानसभेचे जागावाटप मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे पार्लमेंटरी बोर्डच करेल. कारण अंतिम अधिकार त्यांचाच आहे. मधले कुठलेही नेते काहीही बोलले तरी त्याला महत्व नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
भाजपची एकूण राजकीय धोरणात्मक व्यूहरचना लक्षात घेता बावनकुळे यांनी जे म्हटले, ते 100 % सत्य आहे. पण या ढळढळीत दिसणाऱ्या सत्याकडे माध्यमांनी पूर्ण दुर्लक्ष करून “राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे”, अशी जाहिरात केल्याने जणू महाराष्ट्रात कुठली तरी वेगळीच राजकीय क्रांती झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या शिवसेना – भाजप युतीमध्ये मतभेदाची ठिणगी पडली, असे “आऊट ऑफ प्रपोर्शन” चित्र निर्माण केले आहे. म्हणजेच मराठी भाषेतल्या म्हणीनुसार राईचा पर्वत केला आहे.
माध्यमांचे काँग्रेसी स्टाईल रिपोर्टिंग
पण मूळात त्यापलीकडे देखील एक प्रश्न आहे जिथे ठिणगी नसते, तिथे ती शिलगावणे मराठी माध्यमांना का भाग पडते?? ते कशातून तसा निष्कर्ष काढतात??, या प्रश्नांचा बारकाईने विचार केला तर भाजपचे “राजकीय नेचर” आणि मराठी माध्यमांचे “काँग्रेसी स्टाईल रिपोर्टिंगचे नेचर” यातला मूलभूत फरक लक्षात येतो.
मराठी माध्यमे भाजपचे रिपोर्टिंग करताना काँग्रेसचेच निकष लावून रिपोर्टिंग करतात. काँग्रेसमध्ये जसे वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ पातळीवरचे नेते देखील माध्यमांमध्ये जाऊन किंवा त्यांच्या आवडत्या माध्यम प्रतिनिधींना भेटून पक्षातल्या आतल्या गोटातल्या बातम्या खुशाल सांगतात आणि त्या आधारावर पत्रकार आणि माध्यमे स्कूप्स तयार करतात तसेच काहीसे पत्रकारांना भाजपच्या बाबतीत करावी असे वाटते. पण भाजपमध्ये विशेषतः मोदींच्या भाजपमध्ये तशी सोयच उरलेली नाही.
माध्यमांची दुकाने मोदी चालवत नाहीत
माध्यमांच्या स्कूप्सची दुकाने मोदी चालवत नाहीत आणि कुणाला चालवू देत नाहीत. म्हणजे निदान भाजप मधल्या फटींना माध्यमांसमोर किंवा निवडक पत्रकारांसमोर उघड करू देत नाहीत. पत्रकारांना भाजप मधल्या आतल्या गोटातल्या खऱ्या बातम्या मिळतच नाहीत. कारण भाजपच्या आतल्या गोटातल्या बातम्या खेचून आणण्याची राजधानीतल्या पत्रकारांची कपॅसिटी नाही.
पण बातम्या तर चालवाव्यात लागतात. नॅरेटिव्ह तर सेट करावा लागतो, म्हणून मग अर्ध्या कच्च्या सोर्सेसच्या आधारावर भाजप मधल्या आतल्या गोटातल्या बातम्या पेराव्या लागतात आणि त्यातून नसलेल्या ठिणग्यांना शिलगावत बसावे लागते. शिवसेना-भाजप युतीत मतभेदाची ठिणगी पडल्याची बातमी हा त्यातलाच प्रकार आहे.
शिंदे गटाची हिंमत नाही
वास्तविक एकनाथ शिंदे आणि त्यांचा अख्खा गट यांची सध्याच्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वा विरोधात आवाज टाकण्याची राजकीय हिंमत नाही. तशी त्यांना गरजही नाही. तसा आवाज टाकल्यावर काय होते हे त्यांनी “उद्धव ठाकरे परिणामातून” बघितले आहे. किंबहुना भाजप विरुद्ध आता आवाज टाकण्यात शिंदे गटाचा काहीही लाभ नाही. एवढे राजकारण नक्की एकनाथ शिंदे यांना कळते. त्यामुळे भाजप – शिवसेना युतीत मतभेद निर्माण करणे हा शिंदे गटाचा घास नाही. मग खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कितीही बयानबाजी केली तरी एकदा “वरून” निर्णय झाला, तर तेही आपली कॅपॅसिटी वापरून तो फिरवू शकत नाहीत. त्यामुळे मूळातच शिवसेना आणि भाजप या दोन्हींच्या राजकीय सोयीनुसार सध्या मतभेदाची ठिणगी पाडणे शक्य नाही. त्यामुळे मतभेदाच्या ठिणग्यांच्या बातम्या या माध्यमांनीच केलेला राईचा पर्वत आहे, ही वस्तुस्थिती आहे.
Shivsena – BJP alliance intact, no cracks; but marathi media ignite the flames
महत्वाच्या बातम्या
- मध्यप्रदेश : सातपुडा भवन इमारतीला भीषण आग, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी हवाई दलाची मागितली मदत
- प्रियांकांना राष्ट्रीय मैदानात उतरवण्याची तयारी याचा अर्थ काँग्रेसचा “राहुल प्रयोग” फसल्याची कबुली!!
- कायदा सुव्यवस्थेबाबत विरोधकांचा “नॅरेटिव्ह गदारोळ”, पण महाराष्ट्राच्या सर्वेक्षणात मात्र शिंदे – फडणवीसांनाच पूर्ण बहुमत!!
- अभिनेत्री राधिका देशपांडेची “द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक” या कार्यक्रमात हजेरी अनेक प्रश्नांना दिली