• Download App
    राज्यसभेसाठी नजरबंद 5 स्टार सरबराई : शिवसेना आमदारांना रिट्रीट, तर भाजप आमदारांना ताज!!; बिले भरणार कोण??|Shivsena and BJP MLAs shifted to 5 star hotels in Mumbai

    राज्यसभेसाठी नजरबंद 5 स्टार सरबराई ; शिवसेना आमदारांना रिट्रीट, तर भाजप आमदारांना ताज!!; बिले भरणार कोण??

    प्रतिनिधी

    मुंबई : 10 जून रोजी होणा-या राज्यसभा निवडणुकीत कोणताही घोडेबाजार होऊ नये यासाठी शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी खबरदारी घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी या दोन्ही पक्षांना प्रत्येक मत महत्वाचं आहे. त्यामुळे यात दगाफटका होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांनी व्यूहरचना आखली आहे.Shivsena and BJP MLAs shifted to 5 star hotels in Mumbai

    त्यामुळेच शिवसेनेने आपल्या सर्व आणदारांना हॉटेल रिट्रीट येथे रवाना केले आहे. तर भाजपने आपल्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये धाडल्याचे समजत आहे. पण या आमदारांच्या फाईव्ह स्टार सरबराईची भरमसाट बिले नेमके कोण भरणार? हा प्रश्न तयार झाला आहे.



    शिवसेना आमदार हॉटेलकडे रवाना

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व आमदारांची सोमवारी संध्याकाळी बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना लक्ष असल्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर या सर्व आमदारांना रात्री बसमधून मालाडच्या रिट्रीट हॉटेलकडे रवाना करण्यात आले. तसेच या हॉटेलच्या बाहेरही शिवसैनिकांची या आमदारांवर नजर असल्याचे सांगण्यात येत आहे.

    भाजपच्या आमदारांना ताज

    त्याचबरोबर भाजपलाही घोडेबाजाराची भीती असल्याने भाजपनेही आपल्या आमदारांना मुंबईतील ताज हॉटेलमध्ये धाडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभा निवडणूक ही चुरशीची होणार आहे, त्यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

    Shivsena and BJP MLAs shifted to 5 star hotels in Mumbai

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस