विशेष प्रतिनिधी
पुणे : सुप्रियाताई सुषमा आक्कांच्या “हक्काच्या” म्हणून ठाकरेंच्या शिवसैनिकांनी तलवारी म्यानच करायच्या!!, अशी अवस्था ठाकरेंच्या शिवसैनिकांवर पुणे जिल्ह्यात आली.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बैठक पुण्यात झाली, त्यावेळी बारामती, दौंड, इंदापूर वगैरे तालुक्यांमधल्या ठाकरेंच्या शिवसैनिकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जोरदार तक्रारी केल्या. सुप्रिया सुळे महाविकास आघाडीत शिवसैनिकांचा मान राखत नाहीत. त्यांना कधी बैठकांना किंवा कुठल्या कार्यक्रमाला बोलवत नाहीत.
त्या महाविकास आघाडीत आपलीच मनमान चालवतात, अशा तक्रारींचा पाढा शिवसैनिकांनी संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या पुढे वाचला. या तक्रारींवर उद्धव ठाकरे यांनी तोडगा काढून शिवसैनिकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा पुणे जिल्ह्यातल्या ठाकरेनिष्ठ शिवसैनिकांनी व्यक्त केली.
पण या सगळ्यावर सुषमा अंधारे यांनी एक वक्तव्य करून पाणी फेरले. शिवसैनिकांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जरूर तक्रारी केल्या, पण त्यांच्यावर नाराज व्हायचा आमचा “हक्क” आहे. कारण ते आमच्या “ताई” आहेत. शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली, तरी लगेच आम्ही काही ढाली – तलवारी काढल्या नाहीत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
सुषमा आक्कांच्या या वक्तव्यातून शिवसैनिकांना तलवारी “म्यान” करण्याचे “आदेश” दिले गेले. कारण सुप्रियाताई या सुषमा आक्कांच्या “हक्काच्या” निघाल्या. मग त्यांचा निष्ठावंत शिवसैनिकांची काही संबंध नसला तरी चालेल, पण निष्ठावंत शिवसैनिकांनी शिवसेनेच्या मूळ पद्धतीनुसार तलवारी वगैरे उपसू नयेत, असेच सुषमा आक्का यांनी सूचित केले.
Shivsainiks targets supriya sule, but sushma andhare defends her
महत्वाच्या बातम्या
- 10 आमदारांच्या बळावर विरोधी पक्षनेते पदासाठी पवारांचा “मोठ्ठा डाव”; पण ठाकरे + काँग्रेसला पटतचं नाय!!
- Bhandara : भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
- Muhammad Yunus : मोहम्मद युनूस राजीनामा देतील? बांगलादेशात निषेधाचे आवाज उठू लागले
- Guillain Barré : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमची एकूण रूग्ण संख्या ६७ वर पोहचली