• Download App
    राज्यात आता शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार; कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय | Shivbhojan thali will now be available in parcel form in the state

    राज्यात आता शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार; कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपुर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश आज दिले आहेत… Shivbhojan thali will now be available in parcel form in the state

    कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.



    यावेळी श्री भुजबळ म्हणाले की सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल आपण केला नाही. त्याचबरोबर श्री भुजबळ म्हणाले की पूर्वीप्रमाणेच ५ रूपयात शिवभोजन थाळी सर्व सामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे….

    कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी सरकारने “ब्रेक दि चेन” या मोहिमेच्या अंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांच सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो त्यामुळे सर्वांनी राज्यसरकारला सहकार्य करावे असे आवाहन देखील मंत्री भुजबळ यांनी केले आहे

    Shivbhojan thali will now be available in parcel form in the state


    इतर बातम्या वाचा…

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!