• Download App
    शिवसेनेची पत्रकार परिषद की राजकीय मेळावा??; मुंबईकरांच्या त्रासात भर, वाहतुकीचा खोळंबा!! । Shiv Sena's press conference or political rally ??; Add to Mumbaikars' woes, traffic congestion !!

    शिवसेनेची पत्रकार परिषद की राजकीय मेळावा??; मुंबईकरांच्या त्रासात भर, वाहतुकीचा खोळंबा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकिय घमासान सुरू असताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत याच शिवसेना आमदार खासदार आणि नेत्यांचे शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत आहेत भाजपला भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात घालण्याची भाषा त्यांनी केली आहे. Shiv Sena’s press conference or political rally ??; Add to Mumbaikars’ woes, traffic congestion !!

    परंतु संजय राऊत आणि शिवसेना नेत्यांची ही पत्रकार परिषद आहे की मोठ्या राजकीय कार्यक्रमाचा मेळावा आहे?, असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी मुंबई पोलिसांनी शिवसेना भवन परिसर तसेच दादर परिसरामध्ये ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून बंदोबस्त वाढवला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या त्रासातच भर पडली आहे. मुंबईची वाहतूक मंदावली आहे.



    एरवी शिवसेना किंवा अन्य कोणतेही पक्षांचा राजकीय मेळावा असेल जाहीर सभा असेल तर या पद्धतीची वाहतूक मंदावते अथवा दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येते. परंतु आज संजय राऊत आणि शिवसेना नेत्यांची पत्रकार परिषद आहे. ती शिवसेना भवनात आहे. तुला शिवसेनेचे आमदार खासदार आणि नेते हजर राहणार आहेत. दुपारी 4.00 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेच्या आधी दुपारी 2.00 वाजल्यापासून ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत या परिसरातली वाहतूक दुसऱ्या मार्गांनी वळविण्यास संदर्भातले ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तथाकथित स्फोटक पत्रकार परिषदेचा त्रास सर्वसामान्य मुंबईकरांना भोगावा लागल्याचे दिसत आहे.

    Shiv Sena’s press conference or political rally ??; Add to Mumbaikars’ woes, traffic congestion !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मराठा + ओबीसी बेरजेचे राजकारण करताना वजाबाकी नाही झाली म्हणजे मिळवली!!

    दोन लोक भेटल्याच्या मुद्द्यावर किती खोटं बोलावं यालाही मर्यादा असते; प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना टोला

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- जग भारतीय अध्यात्माला महत्त्व देते, अर्थव्यवस्थेला नाही; म्हणूनच आपण विश्वगुरू