विशेष प्रतिनिधी
मुंबई – भाजपला रोखण्याच्या हेतून उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढविण्याचे नियोजन शिवसेनेने केले आहे. उत्तर प्रदेशात शंभर; तर गोव्यात २० ते २१ जागांवर शिवसेनेचे उमेदवार उभे राहतील. भाजपला रोखण्यासाठीच या निवडणुका लढणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.Shiv sena will contest polls in UP and Goa
हिदुत्वाच्या मतांना नवा पर्याय देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहेय या आधीही शिवसेना या ठिकाणी लढली होती. मात्र त्यावेळी त्यांना फारसे यश मिळाले नव्हते. यंदा मात्र महाराष्ट्रात सत्तेत असल्याने शिवसेनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
याबाबत राऊत म्हणाले, “गोव्यात शिवसेनेने गेल्या पाच वर्षांपासून कामे केली आहेत. त्यामुळे या निवडणुकांत चांगले यश मिळेल अशा जागांचा विचार करून आम्ही उमेदवार देऊ.
महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात महाविकास आघाडीसारखाच प्रयोग होण्याची शक्यता असून, शिवसेनेला योग्य सन्मान मिळाला तर या आघाडीत सहभाग होऊ. उत्तर प्रदेशातही विविध ८० ते १०० मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार राहणार आहेत.”
Shiv sena will contest polls in UP and Goa
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईत कोरोनाच्या लसीकरणाला तुफान वेग, तब्बल ८० टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण
- अमेरिकन पॉपस्टार निक जोन्सच्या सोलापुरी चादरीपासून शिवलेल्या शर्टाची चर्चा, सोशल मीडियावर छायाचित्र व्हायरल
- सावधान! महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर वाढू शकतो कोरोनाचा उद्रेक, आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला इशारा
- रिपोर्ट : टी -20 विश्वचषकानंतर विराट कोहली सोडेल कर्णधारपद, रोहित शर्मा सांभाळेल टीम इंडियाची कमान