• Download App
    वरळी सिलेंडर स्फोट दुर्घटनेतील अनाथ मुलाची जबाबदारी शिवसेना घेणार ; महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहितीShiv Sena to take responsibility for orphan boy in Worli cylinder blast accident; Information given by Mayor Kishori Pednekar

    वरळी सिलेंडर स्फोट दुर्घटनेतील अनाथ मुलाची जबाबदारी शिवसेना घेणार ; महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहिती

    दुर्घटना घडलेला परिसर हा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील आहे. यामुळे आदित्य ठाकरेंवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.Shiv Sena to take responsibility for orphan boy in Worli cylinder blast accident; Information given by Mayor Kishori Pednekar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस वरळीत गणपतराव जाधव मार्गावर स्थित कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या महिलेचाही आज कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत चार महिन्याच्या बालकासह माता-पित्यांचाही मृत्यू झाला आहे.

    दरम्यान या कुटुंबातील विष्णू पुरी पाच वर्षीय मुलावर सध्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या अनाथ मुलाची जबाबदारी शिवसेना घेणार असल्याच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.



    पेडणेकर म्हणाल्या की, ५ वर्षाचे अनाथ मुलाला वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत .मूल वाचल्यास आम्ही त्या मुलाला दत्तक घेऊन त्याच पालकत्व आम्हीच स्विकारणार आहोत. तसेच मुलाची प्रकृती सध्या ठिक आहे. पुढे किशोरी पेडणेकर विरोधकांना उत्तर देताना म्हणाल्या की,’संवेदना बोंब मारून येणार नाहीत, तर त्या ह्रद्यातून याव्या लागतात’.

    तसेच दुर्घटना घडलेला परिसर हा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील आहे. यामुळे आदित्य ठाकरेंवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.दरम्यान या टीकेला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, “ब्लास्ट झाल्यावर सेनेचे कार्यकर्ते पोहचले होते. उपचाराकरता त्यांना तात्काळ रूग्णालयातही नेण्यात आले.”

    Shiv Sena to take responsibility for orphan boy in Worli cylinder blast accident; Information given by Mayor Kishori Pednekar

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!