• Download App
    आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेचे दोन्ही गट पक्ष कार्यालयावरून भिडले, पोलिसांनी वेळीच केला हस्तक्षेप|Shiv Sena Row Both factions of Shiv Sena clashed over the party office, Pawar suggested to Thackeray

    आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेचे दोन्ही गट पक्ष कार्यालयावरून भिडले, पोलिसांनी वेळीच केला हस्तक्षेप

    प्रतिनिधी

    मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील कार्यालयावरून शिवसेनेच्या दोन गटातील समर्थकांमध्ये शुक्रवारी सायंकाळी हाणामारी झाली. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दापोलीतील शिवसेना कार्यालयावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.Shiv Sena Row Both factions of Shiv Sena clashed over the party office, Pawar suggested to Thackeray

    पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

    ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गमावल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, कारण जनता त्यांचे नवे चिन्ह स्वीकारणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार म्हणाले की, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने 1978 मध्ये नवीन चिन्ह स्वीकारले होते, पण त्याचा पक्षावर कोणताही परिणाम झाला नाही. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देऊन मूळ ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याच्या निर्णयावर पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.



    एकदा निर्णय घेतला की चर्चा होऊ शकत नाही, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी ठाकरे गटाला दिला. ते स्वीकारा, नवीन निवडणूक चिन्ह मिळवा. त्याचा (जुन्या चिन्हाचा तोटा) काहीही परिणाम होणार नाही. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.

    शिवसेनेच्या प्रकरणात निवडणूक आयोग निर्णयाची घाई का करत आहे, असा सवाल अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय ‘अभूतपूर्व’ असल्याचे सांगून निवडणूक आयोगाला निकाल देण्याची घाई का झाली, असा सवाल केला. शिवसेनेचे सर्वसामान्य कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहतील, असे ते म्हणाले.

    अजित पवार म्हणाले की, हा अनपेक्षित निर्णय आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून 21 फेब्रुवारीपासून या प्रकरणावर निर्णय घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सकाळीच सांगितले असताना निवडणूक आयोगाने एवढी घाई का दाखवली हे समजणे कठीण आहे.

    शिवसेनेची स्थापना कोणी केली हे सर्वांना माहीत आहे, असे ते म्हणाले. हिंदू-हृदयसम्राट कोण होते? शिवसेनाप्रमुख कोण होते? बाळासाहेबांच्या निधनानंतर सेनेचे नेतृत्व कोण करत होते? त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक आणि शिवसेनेला मानणारे मतदार उद्धवजींचा आदर राखतील आणि त्यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे निवडणुकीत सिद्ध करतील, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

    Shiv Sena Row Both factions of Shiv Sena clashed over the party office, Pawar suggested to Thackeray

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस