• Download App
    Shiv Sena सत्तेची इच्छा जिरली; महाविकास आघाडी संपली; शिवसेना उबाठाची महापालिका स्वतंत्र लढाईची तयारी; काँग्रेस + पवार एकाकी!!

    सत्तेची इच्छा जिरली; महाविकास आघाडी संपली; शिवसेना उबाठाची महापालिका स्वतंत्र लढाईची तयारी; काँग्रेस + पवार एकाकी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेची इच्छा जिरवली. महाविकास आघाडी संपली. त्यामुळे शिवसेना उबाठाची महापालिका निवडणुका स्वतंत्र लढायची तयारी झाली. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तशी घोषणा करून टाकली. काय व्हायचे ते होऊ द्या. पण मुंबई पासून नागपूरपर्यंत सगळ्या महापालिका शिवसेना स्वतंत्रपणे लढून आपली ताकद आजमावेल, असे संजय राऊत यांनी जाहीर केले.

    महाविकास आघाडीत शिवसैनिकांना अपेक्षेप्रमाणे निवडणूक लढवायची संधी मिळत नव्हती. महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढलो, तर शिवसैनिकांना अपेक्षेनुसार संधी तरी मिळेल. त्यामुळे शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढेल. इतर पक्षांनी देखील स्वतंत्रपणे निवडणुका लढवून आपापली ताकद आजमावावी, असे संजय राऊत म्हणाले.

    संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत भूकंप झाला. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी स्थानिक पातळीवर युती किंवा आघाडी करायचा निर्णय कार्यकर्तेच घेतील, असे सांगून हात वर केले.

    पण या सगळ्यांमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी मात्र महाविकास आघाडीत एकाकी पडली विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना जी झोपली ती अजून झोपलीच आहे काँग्रेस अजून मरगळलेलीच आहे, पण आपण कामाला लागू असे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले होते. पण संजय राऊत यांनी आजच “जागे” होऊन शिवसेना उबाठा स्वतंत्र लढायची घोषणा करून टाकली. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी एकाकी पडली. प्रत्यक्षात पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटलांविरुद्ध तरुणांचा आवाज उठला. निवडणुकीची तयारी सुरू करण्याऐवजी शरद पवारांच्या उरल्या सुरल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी सुरू झाली.

    shivsena UBT shattered dreams of MVA, to fight municipal elections along

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस