• Download App
    पूरग्रस्तांना मदत पोहोचण्याआधीच धनुष्यबाणाची जाहिरात आली; सोशल मीडियावरून शिवसेनेवर टीकास्त्र|Shiv sena on the forefront for advertising itself instead of helping flood affected people

    पूरग्रस्तांना मदत पोहोचण्याआधीच धनुष्यबाणाची जाहिरात आली; सोशल मीडियावरून शिवसेनेवर टीकास्त्र

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सवंग लोकप्रियतेसाठी मी पूरग्रस्तांच्या मदतीची नुसती घोषणा करणार नाही. सर्व पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकार मदत जाहीर करेल आणि केंद्राकडे देखील मदत मागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त कोकणाच्या दौर्‍यात जाहीर केले होते.Shiv sena on the forefront for advertising itself instead of helping flood affected people

    याच दौऱ्यात शिवसेना आमदार आणि राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचा अरेरावीचा प्रसंगही घडला. याचा अर्थ प्रत्यक्ष पूरग्रस्तांना अद्याप राज्य सरकारची मदत पोहोचलेली नाही. परंतु ही मदत पोहोचण्याआधीच शिवसेनेची पूरग्रस्तांना मदत केल्याची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. गेल्या वर्षी जो पूर आला होता त्यावेळेला शिवसेनेच्या काही शाखांनी कोकणामध्ये मदत केली होती. त्यावेळचे शूटिंग केलेला हा व्हिडिओ आहे.



    यंदाच्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण कोकणात विशेषत: रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यात जनतेचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण चिपळूण शहर पुराच्या पाण्यात उभे राहिले होते. पूर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. चिपळूणमध्ये स्थानिक आमदार भास्कर जाधव हे त्यांच्या समवेत होते.

    मुख्यमंत्र्यांनी तिथे दिलेली भेट आणि केलेली घोषणा यापेक्षा भास्कर जाधव यांची अरेरावी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अधिक गाजली. आणि त्यात आता भर म्हणून शिवसेना पूरग्रस्तांना कशी मदत करते आहे याची जाहिरात सोशल मीडियावर फिरते आहे. त्यामुळे सोशल मीडिया वरच शिवसेनेवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे.

    कोकणातल्या आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांना मदत अजून पोहोचायची आहे. मुख्यमंत्र्यांचा फक्त कोकणाचा दौरा पार पडला आहे. दक्षिण महाराष्ट्राचा दौरा त्यांना रद्द करावा लागला आहे. तरीही शिवसेनेने मदत करण्याऐवजी जाहिरात करण्यात आघाडी घेतली आहे, असे टीकास्त्र सोशल मीडिया वरून सोडण्यात येत आहे.

    Shiv sena on the forefront for advertising itself instead of helping flood affected people

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!