सत्तासुंदरीसाठी वरच्या नेत्यांचे गळ्यात गळे असले खालच्या नेत्यांना आपले राजकारण पुढे चालवायचे असल्याने भांडाभांडीची वेळ आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेंकाविरुध्द आरोप-प्रत्यारोप करत आहेत. जयंत पाटील, बाळासाहेब थोरातांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना खासदाराने केली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यावर राष्ट्र वादी कॉँग्रेसनेच भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.Shiv Sena MP’s demand to file charges against Bhandabhandi, Jayant Patil, Balasaheb Thorat, while NCP’s allegations of corruption against Shiv Sena minister
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सत्तासुंदरीसाठी वरच्या नेत्यांचे गळ्यात गळे असले खालच्या नेत्यांना आपले राजकारण पुढे चालवायचे असल्याने भांडाभांडीची वेळ आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेंकाविरुध्द आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
जयंत पाटील, बाळासाहेब थोरातांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना खासदाराने केली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यावर राष्ट्र वादी कॉँग्रेसनेच भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
नगर जिल्ह्यात शिवसेनेचे शिवसेनेचे शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे आणि कॉँग्रेस- राष्ट्र वादीच्या नेत्यांमध्ये वाद पेटला आहे. निळवंडे कालव्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार लोखंडे यांनी केला आहे.
या दौऱ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप यावेळी लोखंडे यांनी केला आहे. निळवंडे डाव्या कालव्यावरील आढळा जलसेतूचा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरेंसह आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पाहणी दौरा केला.
यावेळी सर्व अधिकारी आणि कार्यकर्ते मिळून 100 पेक्षा अधिक लोक जमले. त्यामुळे या प्रकरणी कार्यकारी अभियंते गिरीश संघाणी व अधीक्षक अभियंते अरुण नाईक यांची चौकशी करून पदाधिकºयांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे केली आहे.
सोशल डिस्टंसिंगची कोणतीही काळजी घेण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केलाय.संबंधित कामे चालू करण्यासाठी मी अधिकाऱ्यांना बोलावले होते.
मात्र मर्तील ठेकेदाराची मर्जी सांभाळण्यासाठी यावेळी संबंधित अधिकारी कोरोनाचे नाव व जमावबंदीचे कारण सांगून आले नव्हते. मग दौऱ्या त कोरोनाचे कोणतेही नियम का लागू नव्हते,असा सवालही खासदार लोखंडे यांनी केला.
औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या गावात त्यांच्याच खात्यातील कामात घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्याने केला आहे.
भुमरे यांच्या स्वत:च्या गावात रोजगार हमी अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामासाठी दाखवण्यात आलेले कामगार चक्क कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे नेते दत्ता गोडे यांनी केला आहे.
औरंगाबाद-बीड हायवे ते साजेगाव रोड या रस्त्याचं काम रोजगार हमी योजनेतून करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र या रस्त्याचे काम कामगारांनी नव्हे तर जीसीपी आणि पोकलेनेच्या साह्याने करण्यात आले आहे.
मात्र कागदोपत्री बोगस नाव दाखवण्यात आल्याचं आरोप गोर्डे यांनी केला आहे. कामासाठी दाखवण्यात आलेले कामगार कोविड पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप दत्ता गोर्डे यांनी केला आहे.
Shiv Sena MP’s demand to file charges against Bhandabhandi, Jayant Patil, Balasaheb Thorat, while NCP’s allegations of corruption against Shiv Sena minister
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीचा कट, न्यूयॉर्क टाईम्सचे बनावट पान तयार करून सोशल मीडियावर केले व्हायरल
- जूनपर्यंत लस उपलब्धतेची परिस्थिती सुधारणार, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- केंद्राकडे मदतीचे रडगाणे गात बसण्यापेक्षा कबुल करा आमची क्षमता नाही, राज्य सरकार बरखास्त करा, नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
- पुणे जिल्हा ऍक्टिव्ह रुग्णांचा मोठा हॉटस्पॉट ; शुक्रवार अखेर ५८ हजार ८४० जण आढळले
- अंदमानात वर्षातील पहिला पाऊस बरसला ; मॉन्सून वारे दाखल ; केरळकडे वाटचाल सुरु