• Download App
    शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी अख्रेर मागितली ब्राह्मण समाजाची जाहीर माफी । Shiv Sena MP Vinayak Raut finally apologizes to the Brahmin community

    शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी अख्रेर मागितली ब्राह्मण समाजाची जाहीर माफी

    वृत्तसंस्था

    मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काल औरंगाबाद येथे ब्राह्मण समाजावर भाष्य केले होते. ज्यामध्ये ब्राह्मण समाज व हिंदुत्वाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दरम्यान त्यांच्या आता या विधानांवर राज्यातील ब्राह्मण संघटना आक्रमक झाल्या. राऊत यांनी तात्काळ समाजाची माफी मागावी अन्यथा मातोश्रीवर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ब्राह्मण सेवा संघाने दिला होता. त्यानंतर राऊत यांनी ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागितली आहे. Shiv Sena MP Vinayak Raut finally apologizes to the Brahmin community



    यावेळी राऊत म्हणाले, आज ब्राह्मण समाजाच्या सदस्यांची भेट घेताना आनंद झाला. काही कळत नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाले त्यात कोणाचाही अनादर करणे हा उद्देश नव्हता. मी नतमस्तक आणि माफी मागायला आलो आहे. ब्राह्मण समाजाची माफी मागून त्यांनी कृपा आशीर्वाद कायम ठेवावा असे आवाहन केले आहे. याशिवाय काही चूक झाली असेल तर माफ करा, असेही त्यांनी म्हटले आहे.

    Shiv Sena MP Vinayak Raut finally apologizes to the Brahmin community

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस