• Download App
    शिवसेनेच्या खासदाराकडून भ्रष्टाचाराचे समर्थन, म्हणे दहा-वीस टक्के इकडे-तिकडे होणारच|Shiv Sena MP support, says ten to twenty percent will be here and there

    शिवसेनेच्या खासदाराकडून भ्रष्टाचाराचे समर्थन, म्हणे दहा-वीस टक्के इकडे-तिकडे होणारच

    विशेष प्रतिनिधी

    बुलडाणा : राज्यातील महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अडचणीत आले आहे. त्याचे धागेदोरे थेट मातोश्रीपर्यंत पोहोचले आहेत. याचवेळी शिवसनेचे परभरणीचे खासदार संजय जाधव यांनी थेट भ्रष्टाचाराचे समर्थन केले आहे. दहा-वीस टक्के इकडे-तिकडे होणारच असे म्हटले आहे.Shiv Sena MP support, says ten to twenty percent will be here and there

    जाधव म्हणाले, सध्या आम्ही ईडीच्या अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या घेऱ्यात आहोत. ज्या व्यक्ती ईडीच्या कारवाया करत आहे, ते सगळे साव आणि बाकी सगळे चोर, अशी स्थिती सध्या निर्माण करण्यात आली आहे. वास्तविक राजकारणात वावरणारा कोणीही हरिश्चंद्र नाही. हा डोलारा चालवायचा म्हणजे १०-२० टक्के इकडे-तिकडे होणारच.



    जाधव म्हणाले, प्रत्येक पक्षाला त्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. आज जे आमच्यासोबत नाही ते उद्याही राहणार नाहीत किंवा जे सोबत आहेत ते उद्याही सोबत राहतीलच, हे सांगता येत नाही. आपण ताकाला जाऊन भांडे लपविणाऱ्यांपैकी नाही. जे वास्तव आहे ते आपण मांडतो.

    कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. काँग्रेसही प्रदीर्घ काळ सत्तेत होती. मात्र, त्यांनी पूर्वग्रह दूषित होऊन कारवाया केल्या नाहीत. मनमोहनसिंग यांच्या काळात २५ कारवाया झाल्या. परंतु आता २,५०० झाल्यात आणि त्या हेतुपुरस्सर झाल्या आहेत.

    Shiv Sena MP support, says ten to twenty percent will be here and there

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’