विशेष प्रतिनिधी
मुंबई : आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, या काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या विधानावर शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी जबरदस्त पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता? असा सवाल खासदार हेमंत पाटील यांनी चव्हाण यांना केला आहे. ते मुख्यमंत्री आहेत म्हणून तर तुम्ही मंत्री आहेत, असे टोलेही त्यांनी लावले आहेत. Shiv sena MP Hemant Patil reply to Ashok Chavan over his comments of MVA in state because of Congress
खासदार हेमंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता? असा सवाल करत आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असा कुणीही गर्व करु नये, अशी टीका पाटील यांनी केली.
महाविकास आघाडीमध्ये आमचे १०० टक्के नुकसान होत आहे. आमचा वापर केला जात असल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली आहे. आपला वापर होत असल्याच्या बाबी वरिष्ठांच्या कानावर घातल्या आहेत. केवळ उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत म्हणून सगळ सहन करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
अशोक चव्हाण यांनी एक वक्तव्य केले होते. आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, असं ते म्हणाले होते. आम्ही महत्वाचा पक्ष म्हणून आमचे समर्थन महत्वाचे आहे. मुख्यमंत्र्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. काँग्रेस आशावादी आहे, मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे, तिन्ही पक्ष चांगले काम करत आहेत, असे चव्हाण म्हणाले होते. कॉंग्रेसचेही समर्थन महत्वाचे आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांना सत्तेत सामील पक्षांना काही संदेश द्यायचाय हे या वक्तव्यावरून दिसत असतानाच पाटील यांनी त्यावर पलटवार केला आहे.
थोरातांचे समर्थन
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चव्हाण यांच्या विधानाचं समर्थन केले होते. अशोक चव्हाण चुकीचे बोलले नाही. तीन घटक पक्ष आहेत. प्रत्येकाचे महत्त्व आहे. आमचेही महत्त्व आहे. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. आमचे अस्तित्व तुम्ही पाहत आहात. आम्ही पंचायत समितीत नंबर वन आहोत. आमची संख्या कमी म्हणून आम्ही तिसऱ्या नंबरवर आहोत. आमचे मंत्री चांगले काम करत आहेत, असे थोरात म्हणाले होते.
Shiv sena MP Hemant Patil reply to Ashok Chavan over his comments of MVA in state because of Congress
महत्त्वाच्या बातम्या