शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील रिसॉर्टवर सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) यांनी एकत्रित कारवाई करत छापे टाकले. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे.Shiv Sena MLA Pratap Saranaik’s resort in Lonavla raided, ED and CBI take joint action
विशेष प्रतिनिधी
पुणे: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील रिसॉर्टवर सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) यांनी एकत्रित कारवाई करत छापे टाकले.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे.ईडीने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती.
याच अनुषंगाने रिसॉर्टवर छापेटाकले आहेत. मंगळवारी सकाळीच ईडी आणि सीबीआयचे अधिकारी लोणावळा येथील रिसॉर्टवर पोहोचले. याठिकाणी कसून शोध घेतला जात आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशीही केली होती.
ईडीने टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 25 नोव्हेंबरला अमित चांदोळे यांची ईडीने चौकशी केली होती. अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार होते.
टॉप्स ग्रुपकडून एमएमआरडीएला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच देण्यात आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.
राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जायचे. 30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास 150च्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते.
मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत होती. यापैकी काही वाटा प्रताप सरनाईक यांना मिळत असल्याचा संशय ईडीला आहे.
Shiv Sena MLA Pratap Saranaik’s resort in Lonavla raided, ED and CBI take joint action
हत्त्वाच्या बातम्या
- Corona Updates राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तब्बल 48 हजार जणांना डिस्चार्ज
- प्रायव्हसी पॉलिसी कायद्यानुसारच असल्याचे व्हॉट्सअॅपचे न्यायालयात स्पष्टीकरण, पालन केले नाही तर अकाऊंट नष्ट केले जाणार
- भारतातील लसीकरणाविरुध्द षडयंत्र : डॉ. शाहिद जमील यांचा राजीनामा आणि जेकब पुलियल यांची लसीविरुध्द याचिका
- लोकांना धीर देण्याऐवजी विरोधक घाबरवत आहेत, योगी आदित्यनाथ यांचा आरोप