• Download App
    रयतमधील गैरकारभार,भ्रष्टाचाराचा शिवसेनेच्या आमदाराकडून भांडाफोड, बारामतीतील एक जण आहे ‘कलेक्टर’, शरद पवारांनी अध्यक्षपद सोडविण्याची मागणी|Shiv Sena MLA exposes mismanagement, corruption in Rayat, a person from Baramati is a 'collector', Demand of resignation of Sharad Pawar

    रयतमधील गैरकारभार,भ्रष्टाचाराचा शिवसेनेच्या आमदाराकडून भांडाफोड, बारामतीतील एक जण आहे ‘कलेक्टर’, शरद पवारांनी अध्यक्षपद सोडविण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरीबांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेत गैरकारभार आणि भ्रष्टाचार माजला आहे. नोकरी लावण्यासाठी खुलेपणाने पैसे मागितले जातात, असा आरोप शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.Shiv Sena MLA exposes mismanagement, corruption in Rayat, a person from Baramati is a ‘collector’, Demand of resignation of Sharad Pawar

    आमदार शिंदे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून घेतलं जातं. याचे दु:ख वाटते. रयतला देणगी दिली म्हणून मालकी दाखवणं चुकीचं आहे. आज रयतमध्ये नोकरी लावण्यासाठी खुलेपणाने पैसे मागितले जातात.



    बारामतीच्या एकाच व्यक्तीला रयतेचे काम दिले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेचा विचार करून रयत संस्थेचे अध्यक्षपद सोडावे.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहिली होती.

    त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे, असं म्हटलं. मात्र, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली. त्यामुळे शरद पवार हे अध्यक्ष झाले आहेत. राजकीय ताकद असल्याने ही संस्था ताब्यात घेण्यात आली.

    खासदार उदयनराजेंना रयतच्या कार्यकारी मंडळावर घेतले नाही ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे. हे चुकीचे आहे. राजघराण्याने ही जागा रयत संस्थेच्या मुख्यालयाला दिली आहे. पात्रता नसणारे लोक रयत शिक्षण संस्थेवर गेल्याने संस्थेला धोका निर्माण झाला आहे.

    Shiv Sena MLA exposes mismanagement, corruption in Rayat, a person from Baramati is a ‘collector’, Demand of resignation of Sharad Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर