विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची आपापसांत धुसफूस तर दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेत आमदारांचीच अस्वस्थता या कोंडीत ठाकरे – पवार सरकार सापडले आहे. शिवसेनेत एकापाठोपाठ एक आमदार आता उघडपणे शिवसेना नेतृत्वाविरोधात बोलू लागले आहेत. आमदार आशिश जयस्वालांच्या रूपात यामध्ये आणखी एकाची भर पडली आहे.Shiv Sena MLA Ashish Jaiswal targets CM uddhav thackeray over ministerships allotments
शिवसेनेत बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदे मिळाली, पण मी ४ वेळा निवडून येऊन देखील आपल्याला डावलल्याची नाराजी शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी बोलून दाखविली आहे. आधी शिवडीचे आमदार अजय चौधरी, आमदार प्रताप सरनाईक, पुरंदरचे विजय शिवतारे यांच्या नंतर आशिश जयस्वाल यांनीही तक्रार केली आहे. प्रत्येक आमदाराच्या तक्रारी वेगवेगळ्या आहेत. पण यात शिवसेना नेतृत्वावर नाराजीचा समान धागा आहे. काल शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी देखील राजीनामा दिला आहे.
अर्थात त्यामुळे सत्ताधारी असूनही शिवसेनेला नाराजीचे खिंडार पडणार का?, असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. आशिष जैसवाल म्हणाले, की मला चारवेळा निवडून येऊन देखील पक्षात सन्मान मिळत नाही. पक्षाने संधी दिली नसल्याने कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदे देतात पण जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. संधी मिळत नसल्याने मनात दु:ख आणि वेदना आहेत, अशी खंत जयस्वाल यांनी बोलून दाखविली.
मागच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होता. तेव्हा मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्यण मी मान्य करेन, असे म्हणालो होतो. तेव्हा मंत्रिमंडळाबाबत नाराजीचे वक्तव्य मी केले नाही. पण हे तितकेच खरे आहे की काम करूनही आपल्याला संधी मिळत नाही याची कार्यकर्त्यांना खंत वाटते. परंतु शेवटी कोणाला मंत्री करावे आणि कोणाला करु नये, हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो आणि तो निर्णय मी स्वीकारला आहे.” अशी पुस्तीही आमदार जैसवाल यांनी जोडली.
तीन पक्षांचे सरकार आल्यानंतर अनेक अपक्ष आमदारांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद द्यावे लागले. त्यामुळे माझ्यासारख्या वर्षानुवर्षे काम करणाऱ्यावर अन्याय झाला. या परिस्थितीमुळे मनाला वेदना होतात. हे दु:ख आपल्या नेत्यांपुढे मांडणे हा माझा धर्म आहे. जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी माझी व्यथा व्यक्त करतो यात लपवण्यासारखे काही नाही, असे आमदार आशिश जयस्वाल यांनी बोलून दाखविले.
Shiv Sena MLA Ashish Jaiswal targets CM uddhav thackeray over ministerships allotments
महत्त्वाच्या बातम्या
- सर्वदूर पावसामुळे बळीराजा सुखावला, राज्यात सोयाबीनची ९९ टक्के, तर कापसाची ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी – कृषिमंत्री दादाजी भुसे
- एमपीएससी सदस्यांची रिक्त पदे भरण्यास जुलैअखेरचा मुहूर्त, नंतरच होऊ शकणार साडे पंधरा हजार पदांची भरती
- Pakistan Bus Blast : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बसचा स्फोट, नऊ चिनी मजुरांसह 13 जण ठार
- नंदीग्राम निवडणूक निकाल : ममता बॅनर्जीँच्या याचिकेवर शुभेंदु अधिकारींना HCची नोटीस, आयोगालाही दिले हे निर्देश