प्रतिनिधी
ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेला महाविकास आघाडीचा प्रयोग इतर महापालिकांमध्ये करण्याचा आग्रह काही राष्ट्रवादीचे काही नेते धरत आहेत. त्यालाच ठाण्याचे शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी सुरुंग लावला आहे.Shiv Sena mayor Naresh Mhasken undermines Jitendra Awhad’s Mahavikas Aghadi proposal in Thane
ठाण्यात महाविकास आघाडी करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. हा प्रस्ताव शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे जाहीर कार्यक्रमात ठेवला होता. या प्रस्तावावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देण्यापूर्वीच महापौर नरेश म्हस्के यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाण्यात शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. एवढेच नाही तर स्वबळावर बहुमत मिळवून सत्ता आणण्याचे देखील त्यांनी आव्हान स्वीकारले.
हे एक प्रकारे शिवसेनेने ठाण्याच्या महापौरांच्या तोंडून राष्ट्रवादीला आणि विशेषत: जितेंद्र आव्हाड यांना नकार दिल्याचे मानले जात आहे.ठाण्याचा महापौर म्हणून आणि शिवसेनेचे नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची आघाडी करण्याच्या मी विरोधात आहे.
ठाण्यातल्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचे हे मत आहे. शिवसेनेचे पक्षश्रेष्ठी जरी अंतिम निर्णय घेणार असतील तरी नगरसेवक म्हणून आम्ही सर्वजण शिवसेनेने स्वबळावर लढण्यालाच अनुकूल आहोत, असे नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना-राष्ट्रवादीत कलगीतुरा
शिवसेनेचे वरिष्ठ नेते मंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात कालच कळव्यातील एका उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या दरम्यान राजकीय कलगीतुरा रंगला होता. एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समोरच शिवसेना शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले होते.
उड्डाण पुलाचे श्रेय नेमके कोणाचे? या वरून मोठा काल जाहीर वाद झाला होता. या वादामधून महापौर नरेश म्हस्के यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती. आज नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेची परतफेड करून राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी वगैरे काही नाही. शिवसेना ठाण्यात स्वबळावर निवडणूक लढविली आणि सत्तेवर येईल, असे त्यांनी जाहीर करून टाकले आहे.
Shiv Sena mayor Naresh Mhasken undermines Jitendra Awhad’s Mahavikas Aghadi proposal in Thane
महत्त्वाच्या बातम्या
- बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा पसरवणे पडले महागात , पुणे विमानतळावरुन जम्मू काश्मीरच्या तरुणाला पुणे पोलिसांनी केली अटक
- Goa Election : दिवंगत मनोहर पर्रीकरांच्या सुपुत्राला आधी शिवसेनेची आता आपची ऑफर; केजरीवाल गोव्यात, उत्पल पर्रीकरांना पक्षात येण्याचे निमंत्रण
- Goa Election 2022 : संजय राऊत म्हणाले- गोव्यात शिवसेना 10 ते 15 जागा लढवणार, राष्ट्रवादीशी युती करणार !
- सीबीआयकडून गेलच्या मार्केटिंग डायरेक्टरला अटक, कोट्यवधींची रोकडही जप्त, दिल्लीसह अनेक ठिकाणी छापे