- शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Shiv Sena Deputy Leader Raghunath Kuchik charged with rape
विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध ठेऊन तिला गरोदर केले. जबरदस्तीने गर्भपात करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 24 वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल, गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल येथे 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला. कुचिक यांनी या तरुणी सोबत प्रेमसंबंध निर्माण करुन लग्नाचे आमिष दाखवले. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ही तरूण गरोदर राहिली. तेव्हा त्यांची संमती नसताना जबरदस्तीने गर्भपात केला.
या बद्दल कोणाला सांगितले तर तुला मारुन टाकील, अशा धमक्या दिल्या आहेत. या तरुणीची तब्येत ठीक नसताना तिच्याकडून समजुतीच्या करारनाम्यावर सह्या करुन घेतल्या. शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 376, 313, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Shiv Sena Deputy Leader Raghunath Kuchik charged with rape
महत्त्वाच्या बातम्या
- भ्रष्टाचाराच्या सुरस कथा, ट्रक भर पुराव्यांच्या पोकळ बाता : गो. रा. खैरनार ते संजय राऊत व्हाया गोपीनाथ मुंडे!!
- मोठी दुर्घटना : उत्तर प्रदेशात विहिरीत पडून 13 जणांचा मृत्यू मृतांमध्ये 10 मुली; हळदीच्या विधीसाठी विहिरीवर गेले, स्लॅब तुटल्याने पाण्यात पडले
- राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप : अमित शाह, फडणवीसांच्या नावे धमकावत 7500 केले गोळा!!
- समाज में सब नंगे; हिजाबचे समर्थन करणाऱ्या स्वरा भास्करचा हॉट फोटो प्रसिद्ध झाल्याने पितळ पडले उघडे
- ‘त्यांच्याकडे स्टेट एजन्सी, तर आमच्याकडे सेंट्रल एजन्सी’, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल