• Download App
    शिवसेना एका गुबगूबीत खुर्चीपुरती मर्यादित; संपत चालल्याची चंद्रकांत पाटील यांची टीका Shiv Sena confined to a soft chair; Criticism of Chandrakant Patil

    शिवसेना एका गुबगूबीत खुर्चीपुरती मर्यादित; संपत चालल्याची चंद्रकांत पाटील यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    सांगली – शिवसेना ही मुख्यमंत्रीपदाच्या एका गुबगूबीत खुर्चीपुरती मर्यादित झाली असून संपतही चालली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. Shiv Sena confined to a soft chair; Criticism of Chandrakant Patil

    सांगलीमध्ये पाटील हे प्रसारमाध्यमाशी बोलत होते. मंत्री जयंत पाटील यांना घेरावा घातला ही सांगलीतील स्थानिक शिवसैनिकांची भूमिका योग्यच असून जनता आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादीला वैतागले आहेत, असा टोला ही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

    मुंबई बँकेत चेअरमन राष्ट्रवादी आणि व्हाईस चेअरमन भाजपाचा निवडून आला आहे. त्यामुळे आता तर शिवसेनेला कळायला हवं की, शिवसेनेला फक्त एक मुख्यमंत्रीपदाची गुबगुबीत खुर्ची मिळाली आहे, बाकी काही मिळालं नाही. शिवसेनेला सहकार, विद्यापीठ कायदा अशा अनेक गोष्टीची माहिती नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

    मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसचा प्रचार केला काय किंवा शिवसेनेचा तरी सांगलीत भाजपचा उमेदवार निवडून येणार आहे. मात्र सांगलीतील शिवसैनिकांनी मांडलेली भूमिका योग्य असून सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हा वैतागलेला आहे. त्याचे चित्र म्हणजे जयंत पाटील यांना शिवसैनिकांनी सांगलीत घातलेला घेराव आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

    Shiv Sena confined to a soft chair; Criticism of Chandrakant Patil

    Related posts

    राज ठाकरेंचा सावध पवित्रा, पण राज बरोबर आल्याचा उद्धव ठाकरेच लावताहेत धोषा!!

    2633 दिवसानंतर जयंत पाटलांचा राजीनामा; 10 आमदारांचा पक्ष मोठा करण्यासाठी नव्या प्रदेशाध्यक्षांचा प्रस्ताव मांडला!!

    Devendra Fadnavis : टेस्ला भारतात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील पहिल्या शोरूमचे उद्घाटन