• Download App
    आघाडीबद्दल संभ्रम कायम ठेवत उध्दव ठाकरेंचे महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान; नारायण राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदालाही राजकीय प्रत्युत्तर Shiv sena chief uddhav thakeray announces shiv sampark abhiyan; political answer to narayan rane

    आघाडीबद्दल संभ्रम कायम ठेवत उध्दव ठाकरेंचे महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान; नारायण राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदालाही राजकीय प्रत्युत्तर

    प्रतिनिधी

    मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी पुढच्या निवडणूकीत आघाडी होईल की नाही, यावर संभ्रम कायम ठेवत मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान करण्याचे आदेश दिले. राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी हे आदेश दिले. Shiv sena chief uddhav thakeray announces shiv sampark abhiyan; political answer to narayan rane

    महाराष्ट्रात युती होईल किंवा आघाडी होईल की नाही याची चिंता करू नका. तुम्ही शिवसेना गावागावांत पोहोचवा, असे आदेश पक्षप्रमुखांनी दिल्याचे खासदार अनिल देसाई यांनी पत्रकारांना सांगितले. ते देखील बैठकीला उपस्थित होते. हे शिवसंपर्क अभियान १२ जुलै ते २४ जुलै या काळात राबवण्यात येणार आहे. तसेच जनतेची कामे करा, आपला पक्ष बळकट करा, असे आदेशही ठाकरे यांनी दिल्याचे देसाई यांनी सांगितले.



    शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने उध्दव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रीपदाला देखील राजकीय प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. नारायण राणे यांना भाजपने केंद्रीय मंत्रीपदी नेमून महाराष्ट्राची राजकीय असाइनमेंट दिली आहे. त्यांनी त्यावर आपले काम प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान सुरू करते आहे.

    या अभियानात विधानसभानिहाय, तालुकानिहाय आणि पंचायत समितीनिहाय कामे करणे अपेक्षित आहे. अधिकाधिक गावांमध्ये पोहोचत लोकांशी संपर्क वाढवण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार ज्या योजना रावबत आहे, त्या योजना लोकांपर्यंत पोहोत आहेत का, याची खातरजमा करा असे आदेश उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.

    Shiv sena chief uddhav thakeray announces shiv sampark abhiyan; political answer to narayan rane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Narwekar : उमेदवारांना धमकावल्याचे आरोप हास्यास्पद; उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न, व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकरांचे भाष्य

    Shinde Sena : मुंबईत शिंदेंच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला; प्रचारादरम्यान हाजी सालीन कुरेशींच्या पोटात चाकू भोसकला

    Imtiaz Jaleel’ : तिकीट कापल्याने नाराज कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला