• Download App
    शिवसेना - भाजपा पुन्हा एकत्र येण्याची नांदी...??; पवारांच्या खेळी पूर्वी आपली खेळी साधून घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मनसूबा...??|Shiv Sena - BJP reunites ... ??; Chief Minister's intention to play his game before Pawar's game

    शिवसेना – भाजपा पुन्हा एकत्र येण्याची नांदी…??; पवारांच्या खेळी पूर्वी आपली खेळी साधून घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मनसूबा…??

    नाशिक : महाराष्ट्राचे राजकारण “आजी-माजी आणि भावी” या तीन शब्दांत भोवती खेळू लागल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे आणि खळबळ माजली आहे.Shiv Sena – BJP reunites … ??; Chief Minister’s intention to play his game before Pawar’s game

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे या तीन नेत्यांच्या एकापाठोपाठ अशा एक विधानांनी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येत आहेत का…??, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.



    त्यातही काँग्रेस – राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांना त्रास देत असल्याने ते पुन्हा भाजपशी जवळीक साधू शकतात, असे उघड विधान रावसाहेब पाटील दानवे यांनी केल्यामुळे खळबळीत आणखीनच भर पडली आहे. पण या सगळ्यामागे नुसती राजकीय राळ उडवून देण्याचा या नेत्यांचा विचार आहे की खरंच पडद्या पाठीमागे काही राजकारण शिजते आहे…??, अशीही चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. आणि त्या चर्चेत तथ्य असू शकते.

    यामध्ये अद्याप राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यामुळेच शरद पवार यांच्या मनात काही वेगळे चाललेले नाही ना…?? अशी रास्त शंका येते. कालच पवारांनी पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकरवी भाजपची वेगळ्या मार्गाने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अर्थ भाजपशी त्यांची जवळीक होईल की नाही माहिती नाही.

    पण आपल्या सरकारला त्याचा धोका उत्पन्न होऊ शकतो एवढे नक्की समजण्याइतपत उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व चाणाक्ष आहे. त्यामुळे शरद पवार हे स्वतःची कोणती खेळी करून घेण्यापूर्वी आपणच खेळी करून भाजपशी पुन्हा एकदा जवळीक का साधू नये…??, असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार केला असल्यास त्यात नवल नाही.

    महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन नेते “सारख्याला वारखे” आहेत. कारण त्यांनी आपापल्या मित्र पक्षांना धक्का देऊन दुसऱ्याशी राजकीय सलगी करून सत्ता मिळवली आहे.

    हे या दोन नेत्यांमध्ये “साम्य” आहे. त्यामुळे शरद पवार जर आपल्याला अडचणीत आणू शकतात, तर आपणही काही कमी नाही हे उद्धव ठाकरे देखील त्यांना दाखवून देऊ शकतात. यातूनच मुख्यमंत्र्यांनी आजचे “माझे भावी सहकारी”, असे विधान रावसाहेब पाटील दानवे आणि डॉ. भागवत कराड यांच्याकडे पाहून केले नाही ना…!!, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला साथ न देण्याचा छुपा निर्णय घेतला आहेच. अशा स्थितीत एकाकी लढायला लागून शिवसेनेची ताकद जर कमी होणार असेल, तर त्या आधीच शिवसेनेची डागडुजी करून घेणे आणि शिवसेनेला सत्तेत ठेवणे हिताचे ठरेल, असा विचार उद्धव ठाकरे यांनी केला असल्यास कोणाला आश्चर्य वाटायला नको.

    Shiv Sena – BJP reunites … ??; Chief Minister’s intention to play his game before Pawar’s game

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!