• Download App
    बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक सुभाष साबणे देगलूरमधून काँग्रेस विरोधात भाजपचे उमेदवार Shiv Sainik Subhash Sabne is the BJP candidate against Congress from Deglaur

    बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक सुभाष साबणे देगलूरमधून काँग्रेस विरोधात भाजपचे उमेदवार

    प्रतिनिधी

    नांदेड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे देगलूर पोटनिवडणुकीत आता भाजपचे उमेदवार असणार आहेत. Shiv Sainik Subhash Sabne is the BJP candidate against Congress from Deglaur

    नांदेड जिल्ह्यातल्या राजकरणात अशोक चव्हाण यांना जबरदस्त विरोध करून उभ्या राहिलेल्या सुभाष साबणे यांच्या कट्टर शिवसेना समर्थकांना शिवसेनेचे मुख्यमंत्री राज्यावर असताना पोलिसांनी बुटांनी मारले. याच्या निषेधार्थ सुभाष साबणे आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेना सोडली आहे.

    भाजपने त्यांना देगलूरमधून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे. काँग्रेसने रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जगदीश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात सुभाष साबणे यांची लढत होईल. सुभाष साबणे यांच्या रूपातला कट्टर शिवसैनिक फोडून भाजपने त्यांना मैदानात उतरवल्याने देगलूर मधली चुरस वाढली आहे.

    अशोक चव्हाण यांच्या विरोधात सुभाष साबणे यांनी 1984 पासून लढत दिली आहे. नांदेड जिल्ह्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अशोक चव्हाण यांच्या विरोधातील आंदोलनात शिवसेनेचे मुख्यमंत्री राज्यात असताना शिवसैनिकांना पोलिसांच्या बुटांचा मार खावा लागतो हे मला पटले नाही. त्यामुळे मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना छगन भुजबळांनी अटक करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळेला विधानसभेत मी तोडफोड केली होती. एक वर्ष मला निलंबित करण्यात आले होते. परंतु ते मी सहन केले. शिवसेनेच्या अडचणीच्या काळात आम्ही शिवसैनिक शिवसेनेच्या बरोबर होतो. पण
    शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर असताना आम्हाला पोलिसांच्या बुटांचा मार खावा लागला हे मला पटले नाही, असे परखड बोल सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऐकवले आहेत.

    Shiv Sainik Subhash Sabne is the BJP candidate against Congress from Deglaur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!