विशेष प्रतिनिधी
मुंबई : MLA Prakash Surve मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलेला असतानाच, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमात बोलताना सुर्वे यांनी वादग्रस्त विधान केले की, मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे. या वादग्रस्त विधानामुळे सुर्वे यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला आयते कोलित दिले आहे, तसेच त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी वादाला आणखी हवा मिळून मोठा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.MLA Prakash Surve
मनसे नेते नयन कदम यांनी प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, मागाठाणेच्या मराठी माणसाने हा आमदार निवडून दिला आहे का? “मराठी मेली तरी चालेल” स्वतःच्या आईला मारून यूपीची मावशी जगवतो हा, याचा जाहीर निषेध, असे म्हणत नयन कदम यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.MLA Prakash Surve
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. केंद्र सरकारने हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, ठाकरे बंधूंसह राज्यातील मराठी जनतेने तीव्र विरोध करत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या जनरेट्यामुळे अखेरीस सरकारला हा निर्णय मागे घेत जवळपास गुंडाळून टाकावा लागला.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही मराठी भाषेचा आणि अस्मितेचा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी “आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे” असे जे वादग्रस्त विधान केले आहे, त्यामुळे सद्यस्थितीत शिंदे गटाची राजकीय अडचण वाढण्याची शक्यता आहे.
Shinde MLA Prakash Surve Controversial Statement Marathi Mother North India Aunt
महत्वाच्या बातम्या
- MP Madrasa : माजी CJI रमणा म्हणाले- माझ्या कुटुंबावर बनावट खटले दाखल केले; हा सर्व माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होता
- Anil Ambani : अनिल अंबानींच्या 3000 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त:; येस बँक कर्ज प्रकरणात 40 मालमत्तांचा समावेश
- पंजाब आणि महाराष्ट्र संस्कृतीने जोडलेली राज्ये; घुमान मध्ये एकनाथ शिंदेंना संत नामदेव पुरस्कार प्रदान
- शांततेच्या नोबेल पासून अण्वस्त्र चाचण्यांपर्यंत डोनाल्ड ट्रम्पची फिरली मती; उरली नाही रणनीती!!