• Download App
    माध्यमांनी "परस्पर ठरविले" शिंदे - फडणवीस मंत्रिमंडळ; नव्या - जुन्यांची लावली "वर्णी"!!shinde fadnavis new cabinet by media

    माध्यमांनी “परस्पर ठरविले” शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळ; नव्या – जुन्यांची लावली “वर्णी”!!

    विनायक ढेरे

    नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारचा निकाल अद्याप सुप्रीम कोर्टातून आलेला नाही. कोर्टापुढे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच नेते सध्या सरकार चालवत आहेत. पण त्याच सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने मराठी माध्यमे रोज मंत्रिमंडळ विस्ताराच्या नवनव्या तारखा जाहीर करत आहेत. इतकेच नाही तर मंत्रिमंडळात मराठी माध्यमे परस्पर नव्या जुन्या मंत्र्यांची वर्णी देखील लावताना दिसत आहेत. shinde fadnavis new cabinet by media

    शिंदेंचे मात्र जुनेच मंत्री

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या महाविकास आघाडी सरकार मध्ये असणाऱ्या मंत्र्यांनाच पुन्हा स्थान दिले जाईल, असे माध्यमांच्या बातम्यांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. भाजपच्या मंत्र्यांबाबत मात्र माध्यमांमध्ये कन्फ्युजन आहे. अनेकांनी चंद्रकांत दादा पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार अशीष शेलार, प्रवीण दरेकर यांची वर्णी मंत्रिमंडळात आधीच लावून टाकली आहे. इतकेच नाही तर त्यांचे खाते वाटप देखील परस्पर जाहीर करून टाकले आहे.



    भाजपचा गुजरात पॅटर्न

    तर दुसरीकडे काही माध्यमांनी भाजप महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न राबवून एकाही जुन्या मंत्राला स्थान देण्याऐवजी सर्वच्या सर्व नवीन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देईल, असे म्हटले आहे. यासाठी देखील त्यांनी भाजप मधल्या असलेल्या – नसलेल्या सूत्रांचा हवाला दिला आहे. नव्या मंत्र्यांमध्ये त्यांनी संजय कुटे, देवयानी फरांदे, राम शिंदे, श्वेता महाले, मोनिका राजळे, अभिमन्यू पवार यांची परस्पर वर्णी लावून टाकली आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्रातल्या जुन्या भाजपच्या नेत्यांना म्हणजे चंद्रकांत दादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांना पक्षाच्या कामावर जुंपून देखील टाकले आहे.

    मंत्र्यांच्या नावांचे माध्यमांचे पतंग

    आता हे सगळे माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने केले आहे. पण ही सूत्रे नेमकी कोणती?? दिल्लीतली की मुंबई मधली?? भाजपच्या मंत्रिमंडळाची यादी नेमके कोण ठरवणार?? दिल्लीतले अतिवरिष्ठ नेते की राज्यातले नेते??, याचा खुलासा मात्र माध्यमांनी गुलदस्त्यात ठेवलेला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख माध्यमांपैकी एकालाही निश्चित सांगता येत नाही. पण मंत्र्यांच्या नावांचे पतंग मात्र माध्यमांनी भरपूर उडवून घेतले आहेत. उद्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावर जात असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. एवढ्याच सूत्राच्या आधारे मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या नावांचे पतंग उडले आहेत.

    shinde fadnavis new cabinet by media

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!