प्रतिनिधी
मुंबई : समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी “नमो 11 कलमी कार्यक्रम” प्रत्येक पालकमंत्र्यांनी प्राधान्याने राबवावा. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.Shinde-Fadnavis government’s Namo 11-point program in Maharashtra!!
मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक सभागृह येथे, मुंबई उपनगर जिल्ह्यात नमो 11 कलमी कार्यक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा यासह मंत्रीमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. मुंबई उपनगर मधील आमदार मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे,अमित साटम, प्रकाश सुर्वे, आशिष शेलार,मिहिर कोटेचा, पराग शहा, अतुल भातखळकर, पराग अळवणी, मुंबई उपनगरमधील लाभार्थ्यी दूरदृश्यप्रणालीव्दारे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबई उपनगरात नमो 11 कलमी कार्यक्रमाचा शुभारंभ करताना आनंद होत आहे.शासनाच्या सर्व योजना सर्व घटकापर्यंत पोहोचतील यासाठी आपले शासन प्रयत्नशील असून.आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रत्येक घटकाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर राज्याच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे देखील पाठींबा मिळत आहे. हेच लक्षात घेवून राज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे.आम्ही सत्तेत आल्यापासून अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. “शासन आपल्या दारी” हा उपक्रम प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवत आहोत दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून विकास होण्यास मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
समाजातील सर्व घटकांना लाभ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नमो 11 कलमी’ कार्यक्रमातून सर्व समाज घटकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवा. आज मुंबई उपनगरमध्ये हा उपक्रम सुरू होत आहे याचा अत्यंत आनंद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या अनेक महत्वपूर्ण निर्णयामुळे देशाला जगातील पाचव्या स्थानावर नेले आहे त्याच धर्तीवर राज्यातही सर्व घटकांचा विकास करून राज्याला विकासाच्या पथावर नेण्याचा मानस या उपक्रमातून आपण साध्य करत आहोत आज मुंबई उपनगरमध्ये सुरू होत असलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो.कामगार,महिला तसेच समाजातील इतर घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम निश्चीत मदत करेल.प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी नमो कलमी ११ कलमी कार्यक्रम निश्चीत मोलाची भूमिका बजावेल असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. त्याचा आज मुंबई उपनगर जिल्ह्यात शुभारंभ करत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारानुसार समाजातील शेवटच्या घटकाचा विकासावर आधारित अनेक जनहितार्थ निर्णय त्यांनी घेतले आहेत त्याच विचारांवर आधारित सर्वात शेवटच्या घटकापर्यत शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
आज मुंबई उपगनरातील 11 ठिकाणी वेगवेगळया ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. आज सुरू झालेला हा उपक्रम असाच पुढे सुरू ठेवून प्रत्येक घटकाला शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्माने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या सहकार्यातून नमो 11 कलमी कार्यक्रम’यशस्वीपणे राबविणार आहोत, असेही मंत्री श्री. लोढा म्हणाले.
Shinde-Fadnavis government’s Namo 11-point program in Maharashtra!!
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीयमंत्री प्रल्हाद पटेल यांचा वाहनाला अपघात; तीन जखमी, एकाचा मृत्यू ; जाणून घ्या कसा घडला अपघात?
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रेया बुगडेला पाठवली दिवाळी भेट!
- देशाच्या सीमाभागात नागरिक आणि सुरक्षा व्यवस्थेत सामंजस्य वाढविणार संघ स्वयंसेवक!!; मोदी सरकारच्या भक्कम संरक्षण धोरणाला पूरक भूमिका!!
- उत्तर प्रदेश : अलिगडचे नाव बदलणार! हरिगड ठेवण्याची तयारी सुरू, महापालिकेत प्रस्ताव मंजूर