शिल्पा शेट्टीने मुंबईतील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट बास्टिनची शाखा उघडली आहे. त्यामुळे लवकरच त्यांचे रेस्टॉरंट सुरू होणार असल्याचे मानले जात आहे.Shilpa Shetty launches restaurant in Mumbai; Celebrities also attended the dinner
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पाने शेट्टीने नुकतेच मुंबईत एक आलिशान हॉटेल उघडले आहे. तिचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पती राज कुंद्रासोबत रेस्टॉरंटचा मुहूर्त करताना दिसत आहे.असे सांगितले जात आहे की शिल्पा शेट्टीने मुंबईतील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट बास्टिनची शाखा उघडली आहे. त्यामुळे लवकरच त्यांचे रेस्टॉरंट सुरू होणार असल्याचे मानले जात आहे.
पहिल्याच दिवशी त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये मोठी गर्दी झाली होती. तिथे अनेक सेलेब्स जेवायला आले होते. तर स्वतः शिल्पा शेट्टी रेस्टॉरंटमध्ये सर्वांना जेवण देताना दिसली. मुंबईच्या ज्या भागात शिल्पा शेट्टीने एक रेस्टॉरंट उघडले आहे त्या भागात अनेक बॉलिवूड स्टार राहतात.
चांगल्या रेस्टॉरंट अभावी बॉलिवूड स्टार्सला त्या भागापासून खूप दूर जावं लागायचं.पण आता शेट्टीच्या रेस्टॉरंटमुळे त्यांना जेवण करणे सोपे होणार आहे.
शिल्पाने इन्स्टाग्रामवर आपल्या नवीन रेस्टॉरंटचे फोटो पोस्ट केले होते. त्यावेळी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा या हॉटेलमध्ये खाण्याची मजा लुटताना फोटोमध्ये पाहायला मिळाले होते.रेस्टॉरंटच्या पहिल्याच दिवशी खूप गर्दीही झाली होती.अनेक सेलिब्रेटींनीसुद्धा पहिल्याच दिवशी हजेरी लावली होती. शिल्पाला प्रत्यक्ष भेटून तिला शुभेच्छाही दिल्या.
Shilpa Shetty launches restaurant in Mumbai; Celebrities also attended the dinner
महत्त्वाच्या बातम्या
- 10 खासदार कधी निवडून आणता आले नाहीत ते 300 खासदारांच्या नेत्यांना आव्हान देणार!!; निलेश राणेंचा हल्लाबोल
- निळोबारायांच्या वाडयातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार कामांचे भूमिपूजन अजित पवारांच्या हस्ते होणार
- Rahul Gandhi Tweet Viral: ‘लिहून घ्या माझे शब्द, सरकारला शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावे लागतील’, राहुल गांधींचे 10 महिने जुने ट्विट व्हायरल
- या तथाकथित शेतकऱ्यांच्या हट्टामुळे दीर्घकाळ नुकसान, तीन कृषी कायदे रद्द झाल्यावर भारतीय किसान संघाची प्रतिक्रिया