• Download App
    ती नाची, डांसर, बबली.... नवनीत राणांवर टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली; आक्षेपार्ह शब्दांचा वापर|She is Nachi, Dancer, Bubli.... MP Sanjay Raut's tongue slips while criticizing Navneet Rana; Use of offensive words

    ती नाची, डांसर, बबली…. नवनीत राणांवर टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली; आक्षेपार्ह शब्दांचा वापर

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : अमरावती लोकसभा मतदार संघामध्ये वानखेडे यांची लढाई एका ‘नाची’सोबत असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये संजय राऊत बोलत होते. या वेळी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली. नवनीत राणा यांचा उल्लेख करताना त्यांनी नाची, डांसर आणि बबली अशा शब्दांचा वापर केला.She is Nachi, Dancer, Bubli…. MP Sanjay Raut’s tongue slips while criticizing Navneet Rana; Use of offensive words



    लोकसभा निवडणुकी लढाई देशाची लढाई आहे. ही लढाई बळवंत वानखेडे आणि नाची विरोधातील नाही. एका डांसर विरोधातील नाही. एका बबली विरोधातील नाही. तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    मातोश्रीला आव्हान देणाऱ्या बाईच्या पराभवात शिवसेनेचा मोठा वाटा हवा

    ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मातोश्री मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मातोश्री विषय अपशब्द वापरले. हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले, त्या बाईचा पराभव करणे हे शिवसेनेचे पहिले आणि नैतिक कर्तव्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अशा बाईच्या विरोधात शिवसैनिकांनी काम करायला हवे. तिच्या पराभवात शिवसेनेचे योगदान मोठे असला पाहिजे, हा बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश असल्याचे लक्षात ठेवा, असे देखील खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    She is Nachi, Dancer, Bubli…. MP Sanjay Raut’s tongue slips while criticizing Navneet Rana; Use of offensive words

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा