• Download App
    Sharad Pawar पवारांची अघोषित निवृत्ती, महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांना कत्ती; छोट्या मोठ्या कामांवर दृष्टी!!

    Sharad Pawar पवारांची अघोषित निवृत्ती, महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांना कत्ती; छोट्या मोठ्या कामांवर दृष्टी!!

    नाशिक : शरद पवारांची अघोषित निवृत्ती, महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांना कत्ती; छोट्या मोठ्या कामांवर दृष्टी!! असे शरद पवारांच्या गेल्या काही आठवड्या मधल्या राजकीय कृतींवरून समोर आलेय. Sharad Pawar

    आपल्या आत्मचरित्राच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने शरद पवारांनी अचानक निवृत्ती जाहीर केली होती. त्यावरून महाराष्ट्र राजकीय वादळ उठले होते. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय महाभारत घडून त्यांचा पक्ष फुटला आणि त्यांचा पुतण्या भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून गेला. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. या घडामोडींच्या केंद्रस्थानच्या आसपास शरद पवार राहिले. पण 2024 च्या नोव्हेंबर नंतर शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि केंद्राच्या राजकारणामध्ये “ॲक्टिव्ह रोल” करावा असे संख्याबळच न उरल्यानंतर पवारांची खऱ्या अर्थाने अघोषित निवृत्ती सुरू झाली.

    शरद पवारांनी निवृत्ती जाहीर करताना एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती, ती म्हणजे आपण दैनंदिन राजकारणातून निवृत्त होणार असलो, तरी विविध संस्था, ट्रस्ट, संघटना यांची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यांच्या कारभारात आपण लक्ष घालून कालक्रमणा करणार आहोत, असे पवार त्यावेळी म्हणाले होते. पण पवारांना निवृत्त व्हायला त्यावेळी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी प्रतिबंध केला म्हणून पवार अधिकृतरित्या तेव्हा निवृत्ती होऊ शकले नव्हते.

    – waqf सुधारणा चर्चेतून पलायन

    पण आता मात्र खऱ्या अर्थाने पवारांची अघोषित निवृत्ती या अर्थाने सुरू झाली आहे की, पवारांना आता ना राष्ट्रीय राजकारणामध्ये आणि ना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठला “ऍक्टिव्ह रोल” उरलाय!! त्यामुळे पवारांनी राष्ट्रीय मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून स्थानिक मुद्द्यांवर काम सुरू केले आहे. त्याहीपेक्षा ते काम संस्थात्मक पातळीवरचे किंवा अगदी छोट्या-मोठ्या संघटनात्मक पातळीवरचे असल्याचे दिसून येत आहे. अन्यथा पवारांनी waqf सुधारणा कायद्याच्या संसदेतल्या चर्चेच्या वेळी गैरहजर राहण्याचे दुसरे कारणच नव्हते. पवार त्या महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्याच्या चर्चेच्या वेळी संसदेत नुसतेच गैरहजर राहिले असे नाही, तर त्यांनी राज्यसभेत waqf सुधारणा विधेयकावरल्या मतदानात देखील भाग घेतला नाही. त्याचवेळी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतले दोन खासदार अमोल कोल्हे आणि बाळ्यामामा म्हात्रे हे लोकसभेत मतदानाच्या वेळी हजर राहिले नाहीत. त्यांच्यावर देखील पवारांनी कारवाई केली नाही.



    पण पवार जर खरंच केंद्रीय राजकारणात “ऍक्टिव्ह रोल” करणारे नेते राहिले असते, तर त्यांच्या खासदारांची Waqf सुधारणा कायद्याच्या मतदानाच्या वेळी गैरहजर राहण्याची हिंमत झाली नसती आणि ते जर गैरहजर राहिले असते, तर पवारांनी त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय सोडली नसती. पण पवारांनी यातले काहीही केले नाही. याचा अर्थच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी राजकीय गुळपीठ राखण्याच्या दृष्टीने पवारांनी waqf सुधारणा कायद्याच्या चर्चेतून अंग काढून घेतले आणि त्या मुद्द्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून ते मोकळे झाले. यापूर्वी देखील 370 कलमाच्या बाबतीत पवारांनी साधारणपणे अशीच “नरो वा कुंजरो वा” भूमिका घेतली होती. पण निदान पवार त्यावेळी केंद्रीय राजकारणामध्ये “ऍक्टिव्ह रोल” मध्ये तरी होते. आता ते तेवढे “ऍक्टिव्ह रोल”मध्ये उरले नसल्याचे त्यांच्याच राजकीय कृतीतून त्यांनी दाखवून दिले.

    त्या उलट पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी “अचानक” केलेले आंदोलन हाताळणे, त्यांच्यासाठी एमपीएससीच्या अध्यक्षांना फोन लावणे, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत अजित पवारांसमवेत दीर्घकाळ उपस्थित राहणे, तिथे फार वेळ लागेल हे कारण देऊन सोलापूरचा दौरा रद्द करणे हे सगळे पवारांनी केले.

    – शॅडो कॅबिनेट काय करतीय??

    मध्यंतरी पवारांनी त्यांच्या उरलेल्या १० आमदारांपैकी काही आमदारांचे शॅडो कॅबिनेट बनवले होते. त्यांना महाराष्ट्रात पक्ष वाढीचे काम दिले होते. त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला वेगवेगळ्या खात्यातील त्रुटींवरून अचूकपणे घेरायचे कामही सांगितले होते. परंतु यापैकी कुठल्याच कामाचे मॉनिटरिंग गेल्या दीड महिन्यात पवारांनी केल्याच्या बातम्या खुद्द “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनीच दिला नाहीत. त्यामुळे पवारांनी त्या कामाचे मॉनिटरिंग केले की नाही हे कुणालाही कळले नाही. पवारांच्या या राजकीय पाऊलखुणा याच अर्थाने त्यांची अघोषित निवृत्ती आहे. पवारांना त्यांचे कार्यकर्ते निवृत्त होऊ देत नाहीत, पण त्याचबरोबर राजकारणात “ऍक्टिव्ह रोल” करण्यासारखे संख्याबळ आणि राजकीय परिस्थिती देखील उरलेली नाही. त्यामुळे पवारांनी अघोषित निवृत्ती घेऊन आपल्या आवडीनुसार छोट्या-मोठ्या कामांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

    Sharad Pawar’s undeclaird retirement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस