नाशिक : शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला ताटकाळत ठेवत काँग्रेस आणि शिवसेना यांनी अखेरच्या दिवशी त्यांना महाविकास आघाडीची राज्यसभा उमेदवार द्यायचे मान्य केले. एकेकाळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला राज्यसभा उमेदवारीसाठी शिवसेना आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या, तेव्हा कुठे काँग्रेस हायकमांडने आणि उद्धव ठाकरे यांनी त्याच्या उमेदवारीला मान्यता दिल्याची बातमी आली.Sharad Pawar’s rajyasabha candidature on the last date of nomination
एरवी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने नुसती इच्छा व्यक्त केली असली, तरी पहिल्याच दिवशी त्यांची राज्यसभेची उमेदवारी जाहीर व्हायला हवी होती, पण प्रत्यक्षात शरद पवार ज्येष्ठ नेते असले तरी ते त्यांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार निवडून आणू शकल्याने त्यांचे उपयोगिता मूल्य आणि उपद्रव मूल्य घटले. त्यामुळे शरद पवारांना महाविकास आघाडीतल्या काँग्रेस हायकमांड पुढे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे उमेदवारीसाठी हात पसरणे भाग पडले. त्याच वेळी भाजपला डोळा मारून स्वतःचे उपद्रव मूल्य वाढवून घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.
– आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांची हिंमत
पण याच दरम्यान शिवसेनेच्या दोन तरुण शिलेदारांनी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या राज्यसभा उमेदवारी खोडा घालायची “खेळी” करायची हिंमत केली. त्यामुळे शरद पवारांची राज्यसभेची उमेदवारी अक्षरश: अखेरच्या दिवसापर्यंत ताणली गेली. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला प्रियांका चतुर्वेदी, विनायक राऊत, राजन विचारे, चंद्रकांत खैरे, हेमंत गोडसे यांच्यासारख्या “ज्युनियर” नेत्यांच्या स्पर्धेत उतरावे लागले.
– मातोश्रीचा झिजवावा लागला उंबरठा
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी तर उद्धव ठाकरे यांना फोन करून काँग्रेसला राज्यसभा द्या आणि तुम्ही विधानपरिषद घ्या, अशी ऑफर देऊन शरद पवारांची उमेदवारी परस्पर कापली होती. अखेरीस सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांना मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना विनंती करावी लागली होती. तेव्हा कुठे काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही मोठ्या पक्षांचे नेते बधले आणि अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी म्हणजे ४ मार्च 2026 रोजी विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या काँग्रेसच्या तिसऱ्या फळीतल्या नेत्याकडून शरद पवारांची राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली. सोनिया गांधी मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी शरद पवारांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याचे आमचे मत बनले असल्याने ते कदाचित उद्या राज्यसभेसाठी अर्ज दाखल करतील असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्याच या वक्तव्यातून शरद पवारांची उमेदवारी परस्पर जाहीर झाली.
Sharad Pawar’s rajyasabha candidature on the last date of nomination
महत्वाच्या बातम्या
- ठाण्याच्या आनंद आश्रमात एकनाथ शिंदे यांची धुळवड साजरी; पण साधेपणाने!!
- आखाती युद्धाचा तेलाला फटका पण रशियाकडून तेल खरेदीचा भारताचा मार्ग मोकळा!!
- पवारांच्या नेतृत्वाला महाविकास आघाडीतूनच सुरुंग; काँग्रेस आणि ठाकरे यांनी रोखली पवारांची double game!!
- Amit Shah : अमित शहा म्हणाले- ममतांनी बंगालला घुसखोरांचे नंदनवन बनवले; आता त्यांना मतदार यादीतून वगळले