विशेष प्रतिनिधी
पुणे : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा शरद पवार यांच्यावर आरोप केला जातो. पुण्यातील एका कार्यक्रमात खुद्द शरद पवारांनीच आपण वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची कबुली दिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, ज्या वसंतदादांचे सरकार मी पाडले, नंतर त्यांनीच भूतकाळ विसरून, गांधी-नेहरुंचे विचार पुढे नेण्यासाठी मला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला
शरद पवार म्हणाले, “वसंतदादा हे इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने स्वर्णसिंह काँग्रेसमध्ये होतो. पण निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू झाले. त्याला आम्हा तरुणांचा विरोध होता. नंतर आम्ही एकत्र आलो, पण आमच्या दोघांमध्ये एक अंतर होतं. त्यामुळेच आम्ही दादांचे सरकार घालवण्याचं ठरवलं आणि ते घालवलं. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो.
शरद पवार म्हणाले की, पुढे 10 वर्षांनी आम्ही सगळे एकत्र आलो. त्यावेळी मुख्यमंत्री कुणाला करायचा यासाठी बैठक झाली. त्यावेळी अनेक नावांची चर्चा झाली. पण दादांनी सांगितलं आता बाकी कोणाच्या नावाची चर्चा नाही. आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व शरदकडे द्यायचं. म्हणजे ज्या व्यक्तीचा सरकार मी पाडलं ती व्यक्ती गांधी-नेहरूंचा विचार मजबूत करण्यासाठी आम्ही काय केलं हे विसरून मोठ्या अंत:करणाने पुन्हा एकत्र येतं असं हे नेतृत्व त्या काळात काँग्रेसमध्ये होतं.
Sharad Pawar’s public confession
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीत हुमायूं मकबरा परिसरात छत कोसळले, 6 जणांचा मृत्यू; डीएम म्हणाले- हे लोक ASIच्या जागेवर अवैध राहत होते
- हाय पॉवर डेमोग्राफी मिशन, समुद्र मंथन, मेड इन इंडिया जेट इंजिन… लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान मोदींच्या 9 मोठ्या घोषणा
- Akhilesh Removes Pooja Pal : अखिलेश यांनी आमदार पूजा पाल यांना सपामधून काढले; विधानसभेत म्हणाल्या होत्या- योगींनी अतिकला संपवले
- पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून संघाचा गौरव केल्याने सर्व विरोधकांचा चडफडाट; संघ चीन पेक्षा जास्त धोकादायक असल्याचा कांगावा!!