विशेष प्रतिनिधी
सातारा : जावळी सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा जिल्हा बँकेवर निवडून आणण्यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार मकरंद पाटील यांना फोन केले होते. स्वतः शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या निवडणुकीत लक्ष घातल्याने दोन्ही आमदारांनी जावळी सोसायटीच्या मतदारांना शशिकांत शिंदे यांच्यासाठी साकडे घातले होते. सरकार नामा या वेब पोर्टलने या संदर्भातली बातमी दिली होती. Sharad Pawar’s phone, yet Shashikant Shinde defeated by one vote; How did this happen ?; Discussion in political circles
मात्र आता शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला आणि राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे निवडून आले. आहेत. त्यामुळे हे नेमके कसे घडले?, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे. स्वतः शशिकांत शिंदे यांनी आपण शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची माफी मागतो असे म्हटले आहे.
परंतु, दस्तुरखुद्द शरद पवार यांनी स्वतः लक्ष घातलेल्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झालाच कसा?, हा विषय सध्या साताऱ्याच्या नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. पवारांनी स्वतः फोन करूनही मतदारांवर प्रभाव पडला नाही की त्यांच्या फोनची अन्य काही कारणे आहेत अशी दबक्या आवाजात राष्ट्रवादीच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे.
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक सुरुवातीपासूनच मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती. भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरून जिल्ह्याच्या राजकारणात बराच खल झाला होता. त्यांच्या उमेदवारीचे शरद पवार यांच्यापर्यंत ते प्रकरण गेले होते. परंतु जिल्ह्यातल्या नेत्यांनी आपापसात राजकीय पॅचअप करून ११ जागा बिनविरोध केल्या. त्यात उदयनराजे यांचाही नंबर होता. परंतु निवडणूक झाली त्या जागांमध्ये मात्र जावळी सोसायटी मतदार संघाची जागा होती. त्या जागेवर शशिकांत शिंदे यांचा एक एका मताने पराभव झाला आहे.
Sharad Pawar’s phone, yet Shashikant Shinde defeated by one vote; How did this happen ?; Discussion in political circles
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर तोफा भाजपवर; पण फोडणार काँग्रेसच; कीर्ति आझाद तृणमूळ काँग्रेसमध्ये येणार
- रामायण स्पेशल ट्रेनमध्ये वेटर्सचा भगवे कपडे घातल्याने वाद, साधू-संतांनी घेतला आक्षेप
- सीबीआय, ईडी, रॉ यांना विनापरवानगी कोणाचीही माहिती घेण्याचा अधिकार, वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकावरील अहवाल संसदीय समितीने स्वीकारला, काँग्रेस आणि तृणमूलचा विरोध
- सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा : लोकशाहीतील सर्वच सत्ताधाऱ्यांनी दिनक्रम सुरु करण्यापूर्वी स्वतःच आत्मपरीक्षण करावं