विशेष प्रतिनिधी
पुणे : खरी राष्ट्रवादी कोणाची शरदनिष्ठ की अजितनिष्ठ??, या वादाने आता निवडणूक आयोगावर लांच्छन लावणारे वळण घेतले आहे. शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले होते, पण निवडणूक आयोगाने ते मान्य केले नाही. त्यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्याचे परस्पर जाहीर करून टाकले, असा आरोप जयंत पाटलांनी केला. आणि नेमके हेच शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे उद्धवनिष्ठ शिवसेनेचे वळण आहे. Sharad pawar’s NCP going in uddhav shivsena direction, jayant patil targets election commission
निवडणूक आयोगाने शिवसेनेत फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतल्या दोन्ही गटांना बोलावले होते. त्यांना कायदेशीर बाजू मांडायला सांगितली होती. पण ती प्रक्रिया सुरू असतानाच उद्धवनिष्ठ शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर वारंवार आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगावर त्यांनी वेगवेगळे आरोप केले. निवडणूक आयोगाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिवसेनेबाबत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला आणि त्या विरुद्ध उद्धवनिष्ठ शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली. हा फार जुना इतिहास नाही. हा काही महिन्यांपूर्वीच इतिहास आहे.
नेमके हेच इतिहासाचे रिपीटेशन राष्ट्रवादीच्या फुटीच्या बाबत घडत आहे. राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचा दावा शरदनिष्ठ राष्ट्रवादीने केला असला, तरी प्रत्यक्षात निवडणूक आयोगात कायद्याच्या पातळीवर शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ असे राष्ट्रवादीचेच दोन स्वतंत्र अर्ज आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाला दोन्ही बाजू समजून घेण्याखेरीज कायदेशीर पर्यायच उपलब्ध नाही. अर्थातच निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना कायदेशीर नोटीसा पाठविल्या. या नोटीसांना दोन्ही गटांनी आपापल्या पद्धतीने उत्तरे दिली आणि ती कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरू आहे. दोन्ही गटांची सुनावणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. निवडणूक आयोगाने कोणताही निकाल अद्याप दिलेला नाही, तरी देखील निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फूट पडल्याचे परस्पर जाहीर केल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला.
वास्तविक निवडणूक आयोगाने असा कोणताही निर्णय परस्पर जाहीर केलेला नाही. अद्याप निवडणूक आयोगाची प्रक्रिया कायदेशीर चौकटीत आणि सुनावणीच्या पातळीवरच सुरू आहे. मात्र अशा स्थितीत जयंत पाटलांनी निवडणूक आयोगावरच आक्षेप नोंदवत शरदनिष्ठ राष्ट्रवादी उद्धवनिष्ठ शिवसेनेच्या दिशेनेच चालल्याचे स्वतःच दाखवून दिले आहे.
Sharad pawar’s NCP going in uddhav shivsena direction, jayant patil targets election commission
महत्वाच्या बातम्या
- मोदी राजवटीत अविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने “ढोलबडवी पुकार”; पण आता I.N.D.I.A आघाडीचा 14 अँकर्सवर बहिष्कार!!
- भर पावसात अजमेरमध्ये फडणवीसांची दणदणीत सभा; केवळ सत्ता परिवर्तन नाही, तर जनजीवनात परिवर्तनासाठी भाजपा!!
- मुंबईच्या पाच एंट्री पॉईंट्सवरील टोलमध्ये १ ऑक्टोबरपासून १२.५ ते १८.७५ टक्के होणार वाढ
- दिल्ली उत्पादन शुल्क प्रकरणात ‘ED’ने मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी कविता यांना पाठवले समन्स!