विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे मनोज जरांगे यांची अमित शहांवर जहरी टीका; तर दुसरीकडे शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!! असे पवारांचे दुटप्पी आज राजकारणात घडले. Sharad pawar’s double game, he meets eknath shinde; manoj jarange targets amit shah
भाजपच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांना ते भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणाले. त्यामुळे मनोज जरांगे चिडले. जरांगेंनी अमित शाहांवर टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडी किंवा शरद पवार यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही, हे आम्हाला माहिती आहे, पण तुमची सत्ता आहे मग तुम्ही काय केले??, असा सवाल करून मनोज सरांगे यांनी शरद पवारांचा अप्रत्यक्ष बचाव केला.
पण त्याचवेळी अमित शाह यांना महाराष्ट्रातली मराठा जात संपवायची आहे. देशातल्या पटेल, रजपूत, गुजर, ठाकूर, दलित या मोठ्या जाती संपवायच्या आहेत, असा गंभीर आरोप केला. ते गरिबांच्या ढुंगणावर लाथा मारतात, असे अश्लाघ्य उद्गारही मनोज जरांगे यांनी काढले.
एकीकडे मनोज जरांगे असे अमित शाह यांच्यावर बरसत असताना दुसरीकडे शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला सह्याद्री अतिथी गृहावर पोहोचले. तिथे त्यांनी 15 मिनिटे मराठा आरक्षण – ओबीसी आरक्षण या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ सिल्वर ओक वर शरद पवारांना भेटून आले. त्यांना मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या विषयांमध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. दोन समाजांमधला वाद मिटवायला मध्यस्थी करायची साकडे घातले. त्यामुळे महत्त्व आलेल्या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथी गृहावर जाऊन भेट घेतली, पण नेमक्या त्याच सुमारास मनोज जरांगे अमित शाह यांच्यावर बरसले. त्यांच्यावर जहरी शब्दांमध्ये टीका केली. त्यामुळे शरद पवारांचे दुटप्पी राजकारण आज पुन्हा चालू राहिल्याचेच चित्र संपूर्ण महाराष्ट्राला दिसले.