• Download App
    Sharad Pawar यंदाच्या निवडणुकीत पवारांची यंग ब्रिगेड मैदानात, पण सगळे घराणेशाहीचे प्रतिनिधी!!

    Sharad Pawar : यंदाच्या निवडणुकीत पवारांची यंग ब्रिगेड मैदानात, पण सगळे घराणेशाहीचे प्रतिनिधी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत यंग ब्रिगेड मैदानात उतरवली आहे. पण या यंग ब्रिगेडचे वैशिष्ट्य असे, की ती सगळी घराणेशाहीची प्रतिनिधी आहे!!

    शरद पवारांची तरुण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. शरद पवार हे अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज नेते, मंत्री शरद पवार यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना तरुण कार्यकर्त्यांनी शरद पवारांना साथ दिली. विशेष म्हणजे शरद पवार गटातील अनेक तरुण चेहरे देखील संकटकाळात शरद पवार यांच्यासोबत राहिले, अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी देखील यंदाच्या निवडणुकीत तरुणांना मोठी संधी दिली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची ‘यंग ब्रिग्रेड’ मैदानात उतरली आहे. शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या यादीत तरुण चेहऱ्यांची संख्या अधिक आहे. हे सगळे राजकीय घराण्यांचे पुढच्या पिढीचे प्रतिनिधी आहेत.

    Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ पाच बचत योजनांवर FD पेक्षा जास्त मिळत आहे व्याज!

    पक्षातील कमी वयाचे उमेदवार

    तासगावचे उमेदवार रोहित पाटील – २५ वर्षे

    मोहोळच्या उमेदवार सिद्धी कदम – २६ वर्षे

    कारंजाचे उमेदवार ज्ञायक पटणी – २६ वर्षे

    अकोलेचे उमेदवार अमित भांगरे – २७ वर्षे

    अणुशक्तीनगरचे उमेदवार फहाद अहमद – ३२ वर्षे

    बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार – ३३ वर्षे

    आष्टीचे उमेदवार मेहबूब शेख – ३८ वर्षे

    कर्जत जामखेडचे उमेदवार रोहित पवार – ३९ वर्षे

    यापैकी रोहित पवार आणि युगेंद्र पवार शरद पवारांचे नातू तर रोहित पाटील हे आर आर आबांचे चिरंजीव आहेत अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा केलेले आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम हिला पवारांनी मोहोळमधून उमेदवारी दिली आहे. अमित भांगरे, ज्ञायक पटणी प्रतिनिधी आहेत.

    विशेष म्हणजे भाजपातून शरद पवार गटात आलेले समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील या दिग्गज नेत्यांनादेखील शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे. हे नेते निवडून आले तर महायुतीला मोठा फटका बसणार आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने राज्यात 10 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 8 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाली होती. साताऱ्याच्या जागेचा अवघ्या काही मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला होता.

    Sharad Pawar Young Brigade in the election

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस