• Download App
    Sharad Pawar will visit Delhi soon, will advocate for MNS in the Congress court!! शरद पवारांची लवकरच दिल्ली वारी, काँग्रेसच्या दरबारी करणार मनसेची वकिली!!

    शरद पवारांची लवकरच दिल्ली वारी, काँग्रेसच्या दरबारी करणार मनसेची वकिली!!

    Sharad Pawar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शरद पवारांची लवकरच दिल्ली वारी; काँग्रेसच्या दरबारी करणार मनसेची वकिली!!, हे राजकीय चित्र लवकरच दिसून येणार असून स्वतः शरद पवारांनीच या बातमीला वेगळ्या पद्धतीने कन्फर्मेशन दिले.Sharad Pawar will visit Delhi soon, will advocate for MNS in the Congress court!!

    मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढवायचा इरादा काँग्रेसने जाहीर केला पण त्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची पंचाईत झाली. काँग्रेस मुळे महाविकास आघाडीत फूट तयार झाली. त्याचबरोबर बलाढ्य भाजपशी लढताना मतांच्या फुटीची भीतीही निर्माण झाली.



     

    ही भीती दूर करण्यासाठी मनसेला महाविकास आघाडीत घेण्याची गरज तयार झाली पण काँग्रेसच्या मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांनी मनसेला झिडकारले. त्यामुळे महाविकास आघाडीतला तिढा आणखी वाढला. तो सोडवण्यासाठीच शरद पवारांना दिल्ली वारी करावी लागणार आहे. दिल्ली वारी करून काँग्रेसच्या दरबारी मनुष्याची वकिली करावी लागणार आहे. दिल्लीतल्या काँग्रेसच्या वरिष्ठांना भेटून मनसेला महाविकास आघाडीत स्थान देऊ, असे शरद पवारांनी पत्रकारांना सांगितले.

    – पवारांनी वाढवून घेतले स्वतःचे महत्त्व

    या घडामोडीतून शरद पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि स्वतःचे राजकीय महत्त्व वाढवून घेतले. शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई परिक्षेत्रात काहीही स्थान नाही. त्यांचे आमदार खासदार किंवा नगरसेवक सुद्धा नाहीत. तरीदेखील काँग्रेसच्या मुंबईतल्या स्थानिक नेत्यांनी शरद पवारांना मुंबईच्या निवडणुकीच्या निमित्ताने हस्तक्षेप करण्याची संधी दिली. ती संधी पवारांनी भरपूर उचलून मुंबईच्या स्थानिक विषयात काँग्रेस हायकमांडला ओढून आणले.

    Sharad Pawar will visit Delhi soon, will advocate for MNS in the Congress court!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या पुणे जिल्ह्यात भाजपचा स्वबळाचा तडाखा; म्हणून शरद पवारांचा पक्ष अजितदादांना लागला फोडावा!!

    कामगारांसाठी 4 नवीन कायदे लागू; “असे” झाले बदल, “या” मिळणार सुविधा!!

    Chandrashekhar Bawankule : काँग्रेसची अवस्था चिंताजनक, पक्ष कोसळतोय; उबाठाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, जनता आमच्या मागे- चंद्रशेखर बावनकुळे