विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील घर फोडण्याची परंपरा शरद पवार ( Sharad Pawar ) कायम ठेवत असल्याचे दिसत आहे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या त्यांच्याच विरोधात निवडणूक लढविणार आहे असा खळबजनक गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
गोंदिया येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. तर स्वतः मुलगीच वडिलांच्या विरोधात निवडणूक लढायला तयार आहे. धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी शरद पवारांना तीन वेळेस भेटली. माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य नाही अशी ती म्हणाली आहे.
अशीही खळबळजनक माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली आहे. धर्मरावबाबा आत्राम जो कडक जॅकेट घालतो तो काही दिवसात उतरणार आहे असाही टोला यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे.
शरद पवार यांनी महाराष्ट्रातील अनेक घरे फोडली असल्याचा इतिहास आहे. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना उभे केले होते. बीड जिल्ह्यातीलच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे पुतणे संदीप यांना उभे केले होते.
Sharad Pawar will break another house, Dharmaraobaba Atram daughter will contest elections against him
महत्वाच्या बातम्या
- Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची निम्म्याहून अधिक उमेदवारांची नावे ठरली
- UPS : महायुती सरकारने UPS ला दिली मान्यता, केंद्राची नवीन योजना लागू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य!
- विधानसभेसाठी पवारांचा ताटातलं वाटीतचा जुनाच फॉर्म्युला; भाजपचा “असाइनमेंट” आणि पंचायत गटांवर फोकसचा फॉर्म्युला!!
- Mehbooba Mufti : मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या- काँग्रेसने आमचा अजेंडा मान्य केल्यास युतीसाठी तयार; PDPचा जाहीरनामा प्रसिद्ध