• Download App
    मुख्यमंत्री ममता यांच्या समर्थनार्थ उतरले शरद पवार, म्हणाले- राजकीय सूडापोटी CBI-EDचा भाजपकडून वापर सुरू|Sharad Pawar, who came out in support of Chief Minister Mamata, said that BJP is using CBI-ED for political revenge

    मुख्यमंत्री ममता यांच्या समर्थनार्थ उतरले शरद पवार, म्हणाले- राजकीय सूडापोटी CBI-EDचा भाजपकडून वापर सुरू

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कथित गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपविरुद्धच्या लढाईसंबंधी केलेल्या आवाहनाचे समर्थन केले. सीबीआय, ईडी यांसारख्या केंद्रीय एजन्सींचा राजकीय सूडासाठी वापर केल्याचा मुद्दा त्यांनी संसदेत उपस्थित केला.Sharad Pawar, who came out in support of Chief Minister Mamata, said that BJP is using CBI-ED for political revenge


    वृत्तसंस्था

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कथित गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपविरुद्धच्या लढाईसंबंधी केलेल्या आवाहनाचे समर्थन केले. सीबीआय, ईडी यांसारख्या केंद्रीय एजन्सींचा राजकीय सूडासाठी वापर केल्याचा मुद्दा त्यांनी संसदेत उपस्थित केला.

    केंद्रीय तपास यंत्रणांच्या कथित वापराबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपेतर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, “आम्ही उद्या संसदेत हा मुद्दा मांडू. याप्रकरणी एकत्र काय करता येईल ते बघू.”



    याआधी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांनी भाजपवर राजकीय सूडबुद्धीतून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी नेत्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. आपल्या पक्षाचे नेते नवाब मलिका आणि अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत ते म्हणाले, “आज सत्तेत असलेल्यांना असे वाटते की जे आपल्या विचारसरणीचे नाहीत ते आपले शत्रू आहेत. सीबीआय आणि ईडीचे छापे आता सामान्य झाले आहेत आणि त्याचा वापर केला जात आहे. राजकीय सूडापोटी राजकीय विरोधकांना त्रास दिला जातोय.”

    शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याच्या विरोधात काहीतरी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात एकच गोष्ट आहे. जनतेची इच्छा काहीही असो, त्यांना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजपची सत्ता हवी आहे.”

    Sharad Pawar, who came out in support of Chief Minister Mamata, said that BJP is using CBI-ED for political revenge

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!