तेलंगना राष्ट्र समितीच्या खासदारांनी आज हिवाळी आधिवेशनाच्या उर्वरीत कालावधीवर बहीष्कार टाकत निलंबीत खासदारांना पाठींबा जाहीर केला आहे.Sharad Pawar visits 12 suspended MPs; MPs sang songs in the agitation
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. या १२ खासदारांवर संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सपा खासदार जया बच्चन आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करणाऱ्या 12 निलंबित खासदारांना भेटून पाठींबा जारी केला आहे. जेव्हा खा. शरद पवार यांनी निलंबित खासदारांची भेट घेतली तेव्हा खासदारांनी गाणी गात आंदोलन केले.
१२ खासदारांच्या निलंबनावरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक आहेत.यावेळी संसंदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांनी माफी मागितली तर निलंबन मागे घेता येईल असे पुन्हा सांगितले आहे.परंतु सर्व निलंबीत खासदारांनी माफी मागणार नाही अशी भुमिका घेतली आहे.
दरम्यान तेलंगना राष्ट्र समितीच्या खासदारांनी आज हिवाळी आधिवेशनाच्या उर्वरीत कालावधीवर बहीष्कार टाकत निलंबीत खासदारांना पाठींबा जाहीर केला आहे.