• Download App
    पवारांचा नवा पक्ष वाढवण्यासाठी नवा फॉर्म्यूला; आधीचा पक्ष फोडणाऱ्यांचीच घरे फोडा!! Sharad pawar using new formula of splitting political dynasty of his own followers

    पवारांचा नवा पक्ष वाढवण्यासाठी नवा फॉर्म्यूला; आधीचा पक्ष फोडणाऱ्यांचीच घरे फोडा!!

    नाशिक : पवारांचा नवा पक्ष वाढवण्यासाठी नवा फॉर्म्युला; आधीचा पक्ष फोडणाऱ्यांचीच घरे फोडा!!, असे सूत्र शरद पवारांनी स्वतःच समोर आणले आहे. Sharad pawar using new formula of splitting political dynasty of his own followers

    शरद पवारांची अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांनी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला नेऊन बसवल्यानंतर पक्ष आणि चिन्ह या दोन्हींवर दावा सांगत ते निवडणूक आयोग आणि नंतर विधानसभा अध्यक्षांकडून आपल्या ताब्यात मिळवले. त्यामुळे शरद पवारांना “राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार” हे व्यक्तिगत स्वरूपाचे पक्षाचे नाव धारण करावे लागले. त्यांना अजूनही चिन्ह मिळालेले नाही.

    परंतु पवारांच्या मूळ राजकीय हालचाली त्यामुळे थांबलेल्या नाहीत. पवारांनी आपला नवा पक्ष वाढवण्यासाठी नवा फॉर्म्युला तयार करून ज्यांनी आपला आधीच्या पक्ष पळवला त्यांचीच घरे फोडण्याचा इरादा बाळगला आहे. याची सुरुवात त्यांनी स्वतःच्याच पुतण्याचे सख्खे घर फोडून केली आहे. त्या पाठोपाठ त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे देखील घर फोडले आहे.



    अजितदादांच्या सख्ख्या पुतण्याला फोडले

    शरद पवारांनी अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार याला त्यांच्यापासून फोडून आपल्या राजकीय गोटात आणला आहे. युगेंद्र पवार यांनी आज बारामतीत शरद पवार गटाच्या कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांची आणि नंतर पत्रकारांशी संवाद साधला. या त्यांनी एक “रहस्यभेद” केला. बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि आपली सख्खी काकू सुनेत्रा पवार यांच्यात लढतच होणार नाही, असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा इरादाही बोलून दाखवला. आजोबा शरद पवारांनी सांगितलेल्या उमेदवाराचा प्रचार करू, असे ते म्हणाले.

    पण युगेंद्र पवारांच्या निमित्ताने शरद पवारांनी बारामतीचा पर्याय उमेदवार आपल्या हाताशी आणल्याचे बारामतीतल्याच राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे. याचा अर्थ सुप्रिया सुळे या लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार नसून त्यांच्या ऐवजी पवारांच्या गोटातून युगेंद्र पवार म्हणजेच अजित पवारांचे सख्खे पुतणे बारामती लोकसभा मतदारसंघातून उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अजित पवारांना आपली पत्नी सुनेत्रा हिला उभे करायचे असेल, तर तिला आपल्या सख्ख्या पुतण्याविरुद्ध उभे करावी लागण्याची शक्यता आहे. ही अजित पवारांच्या सख्ख्या कुटुंबातली फूट ठरणार आहे.

    सुनील तटकरे यांच्या भावाला फोडले

    जो फॉर्म्युला शरद पवारांनी अजित पवारांच्या घरात फूट पाडून बारामतीत वापरला, तोच फॉर्म्युला त्यांनी रायगड मध्ये सुनील तटकरे यांच्या बाबतीत वापरला आहे. सुनील तटकरे यांचे मोठे बंधू अनिल तटकरे यांना शरद पवारांनी स्वतः लक्ष घालून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आहे.

    सुनील तटकरे यांना राज्यसभेची उमेदवारी हवी होती. त्यातून त्यांना स्वतःची खासदारकी “सुरक्षित” करून घ्यायची होती. परंतु, अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल यांच्या पारड्यात आपला कौल टाकल्याने त्यांची खासदारकी “सुरक्षित” झाली आणि सुनील तटकरे “असुरक्षित” झाले.

    आता सुनील तटकरे यांच्या “असुरक्षिततेत” शरद पवारांनी आणखी भर घातली आहे. सुनील तटकरे रायगड मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, तर त्यांच्या विरोधात त्यांचेच थोरले बंधू अनिल तटकरे यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. याचा अर्थ ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली आणि आपला अख्खा पक्ष घेऊन गेले त्यांचेच घर फोडण्याचा शरद पवारांनी फॉर्मुला वापरला आहे. तो अजित पवारांच्या सख्ख्या घरातून सुरू करून सुनील तटकरे यांच्या घरापर्यंत नेऊन ठेवला आहे. आता यापुढे शरद पवार हे अजित पवारांच्या गोटातल्या बाकी कोणत्या नेत्यांचा नंबर लावणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Sharad pawar using new formula of splitting political dynasty of his own followers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस