• Download App
    केंद्रात विरोधी ऐक्यासाठी सर्वांनाच हवेत पॉवरफुल्ल पवार; महाराष्ट्रात मात्र त्यांच्याच राष्ट्रवादीला खिंडार!!|Sharad Pawar trying to unite opposition on national level, but NCP splits at local level

    केंद्रात विरोधी ऐक्यासाठी सर्वांनाच हवेत पॉवरफुल्ल पवार; महाराष्ट्रात मात्र त्यांच्याच राष्ट्रवादीला खिंडार!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य साधण्यासाठी सर्वांनाच हवे 80 वर्षांचे योद्धे पॉवरफुल पवार, पण खाली महाराष्ट्रात मात्र त्यांच्याच राष्ट्रवादीला खिंडार, अशी अवस्था आली आहेSharad Pawar trying to unite opposition on national level, but NCP splits at local level

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोदी सरकार विरोधात जनमत एकवटण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधायच्या तयारीला केव्हाच लागले आहेत. पण खुद्द त्यांच्या पक्षातच सगळे काही अलबेला नाही अशी स्थिती आली आहे. नुकताच विदर्भ दौरा करून आलेल्या शरद पवारांना विदर्भातच त्यांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी झटका दिला आहे. गोंदियाचे नगराध्यक्ष त्यांच्या 15 नगरसेवकांसह आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी राष्ट्रवादीतल्या या सर्व नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे.



    100 कोटींच्या खंडणी प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुख सुटून बाहेर आले त्यानंतर काहीच दिवसांनी शरद पवारांनी नागपूर सह विदर्भाचा दौरा केला होता. तेथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नियुक्त्या करून विदर्भात पक्षाला बळ देण्याची पॉवरफुल खेळी केली होती. मराठी माध्यमांनी त्या पॉवरफुल केळीचे बहारदार वर्णन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात चांगले दिवस येणार असे भाकीत वर्तविले होते.

    त्यानंतर पवारांनी विरोधी एकजुटीसाठी प्रयत्न सुरू केले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी अभिनेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत ते प्रमुख नेते म्हणून सहभागी झाले.

    पण एकीकडे पवारांचे राष्ट्रीय पातळीवर हे मोठे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र महाराष्ट्रात खिंडार पडले आहे. आधी शिरूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आले आणि आता गोंदियातील सडकअर्जुनी नगराध्यक्ष डॉ. चंद्रिकापुरे यांच्यासह 15 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून एकनाथ शिंदे यांचा भगवा हातात धरला धरल्याने राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे.

    Sharad Pawar trying to unite opposition on national level, but NCP splits at local level

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!