विशेष प्रतिनिधी
नागपूर : बांग्ला देशातील घटनांवर महाराष्ट्रात उमटत असलेल्या प्रतिक्रियांवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी गृह खात्यालाच जबाबदार धरले आहे. शासनाचे धोरण, शासनाची कारवाई, गृहखात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल.
मात्र आज मला शांतता आणि सौहार्द याचे जास्त महत्त्व वाटते, असे ते म्हणाले. नागपूर येथे पत्रकारांशी बाेलताना शरद पवार म्हणाले, बांगलादेशमध्ये सत्तांतर झाले. यासाठी तरुण पिढीने उठाव केला होता. त्यातून काही गोष्टी घडल्या. पण दुर्दैवाने त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटली.
प्रामुख्याने बांगलादेशच्या सीमेवरील पश्चिम बंगाल आणि इतर राज्यात परिस्थिती अधिक गंभीर होती. पण तिथे काही घडले त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असे कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात जे काही घडले, ते राज्याच्या हिताचे नाही.
राज्यात शांतता प्रस्थापित करायची असेल तर समाजकारण आणि राजकारणातील व्यक्तीनी सयंमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहिल, याबद्दलची खबरदारी घ्यावी, एवढेच मी सांगू इच्छितो. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांवरही भाष्य केले. ते म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्य दिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना संबंध देशाच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात, अशी भूमिका मांडली.
ती भूमिका मांडून १२ तास होत नाहीत, तोवरच चार राज्यांची निवडणूक वेगवेगळी जाहीर झाल्याचे पाहायला मिळाले. संबंध देशाची निवडणूक एकत्र घेण्याची भूमिका मांडत असताना त्यांनी झारखंड व महाराष्ट्रात निवडणूक जाहीर केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणात विसंगती दिसत आहे, एवढेच याप्रसंगी बोलू शकतो.
Sharad Pawar targets the Home Ministry
महत्वाच्या बातम्या
- Ajit pawar : पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट; शिरणार का पुन्हा काकांच्या पुठ्ठ्यात??; की ते सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात??
- Chief Justice Chandrachud : बांगलादेशातील संकटावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- IMA strike : 17 ऑगस्ट रोजी देशभरात IMAचा संप ; म्हणाले ”रुग्णालयांना ‘सेफ झोन’ घोषित करा”
- प्रशांत किशोर यांनी जेडीयू आणि आरजेडीवर साधला निशाणा!