• Download App
    एएमआयएम आवडे राष्ट्रवादीला : पवारांचे तोंडी टार्गेट शिंदे गट - भाजप; पण फोडताहेत एआयएमआयएम!!Sharad Pawar targets shinde faction and BJP in speech only, but splits AIMIM actually

    एएमआयएम आवडे राष्ट्रवादीला : पवारांचे तोंडी टार्गेट शिंदे गट – भाजप; पण फोडताहेत एआयएमआयएम!!

    • सोलापूरात 8 नगरसेवक फुटून राष्ट्रवादीत!!

    विनायक ढेरे

    खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाचे सोलापूर महापालिकेतील 8 नगरसेवक वरिष्ठ नगरसेवक तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज हा प्रवेश सोहळा होणार आहे. हेच ते तौफिक शेख आहेत, की जे काँग्रेसच्या आमदार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. Sharad Pawar targets shinde faction and BJP in speech only, but splits AIMIM actually

    याचा अर्थ तौफिक शेख यांच्या एएमआयएम मधून राष्ट्रवादीत प्रवेशाचा राजकीय अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. यातून केवळ सोलापूर महापालिकेतले राष्ट्रवादीचे बळ वाढवणे एवढा पुरता मर्यादित हेतू नाही, तर त्यापलिकडेही आणखी बरेच काही आहे. सोलापूर मध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक होते त्यामध्ये आता एएमआयएमच्या 8 नगरसेवकांची भर पडल्यानंतर 12 नगरसेवक होतील. काँग्रेसचे महापालिकेत 14 नगरसेवक होते. याचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्षाचा नगरसेवकांच्या संख्यात्मक पातळीवर तरी तुल्यबळ होणार आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीने आपल्याला काँग्रेस बरोबर समसमान राजकीय बळापर्यंत आणून पोहोचवले आहे.

    राष्ट्रवादीला एमआयएम हे “पॉलिटिकल एलिमेंट” आवडणे फक्त सोलापूर पुरते मर्यादित नाही. किंबहुना या संदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची मूलभूत राजकीय मानसिकता देखील फक्त एखादी महापालिका, एखादा मतदारसंघ एवढ्या पुरती मर्यादित नाही. ती त्या पलीकडची आहे आणि ती म्हणजे काँग्रेसच्या आणि एएमआयएमच्या मुस्लिम मतदाराचा पाया उखडण्याची आहे.

    “द फोकस इंडिया”ची बातमी

    काही महिन्यांपूर्वी “द फोकस इंडिया”नेच संभाजीनगर संदर्भातली एक बातमी प्रसिद्ध केली होती. संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे 2024 च्या निवडणुकीत कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असू शकतात, अशी ती बातमी होती. याचा अर्थ एएमआयएम पक्षाने संभाजीनगर मध्ये तयार केलेली राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी इम्तियाज जलील यांच्या सकट खेचून घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची हा कावा किंवा डाव आहे. याचा देखील अर्थ नीट समजून घेतला पाहिजे.

     राष्ट्रवादीला मुस्लिम प्रेम का??

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसच्याच राजकीय संस्कृतीनुसार विशिष्ट मुस्लिम प्रेम भरलेले आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशाच्या वाट्यात मुस्लिम मतदारांचा विशिष्ट वाटा देखील आहे. पण पक्षाला विधानसभा, लोकसभा अथवा महापालिका निवडणुकांमध्ये मर्यादे पलिकडे यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी मुस्लिम मतांचा वाटा व्यापक अर्थाने वाढविणे अशा दृष्टिकोनातून एएमआयएम फोडण्याच्या राष्ट्रवादीच्या या खेळीकडे पाहिले पाहिजे.

     नवाब मलिक आत राष्ट्रवादी मुस्लिम चेहऱ्याच्या शोधात

    राष्ट्रवादी काँग्रेसचे मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जाणारे नेते नवाब मलिक दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉड्रिंग केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. त्यांची सुटका होण्याची शक्यता नाही अशावेळी राष्ट्रवादीकडे प्रभावी मुस्लिम चेहरा नाही. खासदार इम्तियाज जलील यांच्या रूपाने हा चेहरा एएमआयएम मधून फोडून “आयात” करण्याची शरद पवार यांची भूमिका असेल, तर ती राष्ट्रवादीची राजकीय अपरिहार्यता आहे असे मानले पाहिजे!!

     पवारांची राजकीय स्टाईल

    शिवाय शरद पवारांची स्थानिक पातळीवर छोटे-मोठे घटक राष्ट्रवादीशी जोडून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात “पॉलिटिकली रेलेव्हंट” राजकीय स्टाईल लक्षात घेतली तर राष्ट्रवादीच्या एएमआयएम एलिमेंट मधल्या “राजकीय प्रेमाचे” इंगित ध्यानात येईल!! पवारांच्या या खेळीतून काँग्रेस सारखा पक्ष अधिक दुर्बळ होत जाईल. एएमआयएम सारख्या पक्षाला नवीन राजकीय भूमी शोधावी लागेल. आणि त्याच वेळी भाजप आणि शिवसेना यांच्यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षांसमोर धर्मनिरपेक्ष पक्षांचा एक प्रबळ पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहील. निदान प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत येईल, असाही शरद पवारांचा यातला राजकीय डाव आहे. तो काँग्रेस आणि एआयएमआयएम यांनी ओळखला पाहिजे

    Sharad Pawar targets shinde faction and BJP in speech only, but splits AIMIM actually

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस