• Download App
    एक मंत्री फरार, दुसरे आजारी; पवारांकडून मात्र आधी संघाची भलामण, आता सुसंवादाची तरफदारी...!!|sharad pawar talks of conciliatry politics, but his ministers anil deshmukh and hasan mushrif are in the dock of money laundring issues

    एक मंत्री फरार, दुसरे आजारी; पवारांकडून मात्र आधी संघाची भलामण, आता सुसंवादाची तरफदारी…!!

    नाशिक : शंभर कोटींची खंडणीखोरी आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागलेले मंत्री फरार, दुसरे मंत्री हॉस्पिटलमध्ये आजारी… अशी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची अवस्था असताना पक्षाध्यक्ष शरद पवार मात्र टीव्हीच्या मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भलामण आणि आज महाराष्ट्रात सुसंवादाची गरज असल्याचे भाषण करीत असल्याचे चित्र दिसत आहे.sharad pawar talks of conciliatry politics, but his ministers anil deshmukh and hasan mushrif are in the dock of money laundring issues

    शंभर कोटींची खंडणी वसूल केल्याबद्दल राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख सध्या फरार आहेत. त्यांच्या निवासस्थानावर एकापाठोपाठ एक छापे पडत आहेत. ईडी सीबीआय, आयकर खाते त्यांच्या मागे हात धुऊन लागले आहेत. मात्र ईडीचा एवढा गैरवापर पाहिला नाही, एवढीच छोटी प्रतिक्रिया व्यक्त करून पवार गप्प बसले आहेत. उलट मुंबई तकच्या मुलाखती त्यांनी संघाची भलामण केली आहे.



    त्याच वेळी राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री हसन मुश्रीफ मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाच्या घेऱ्यात आले आहेत. मनी लॉन्ड्रिंगचे आरोप करणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शंभर कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची भाषा मुश्रीफ यांनी जरूर केली होती. पण प्रत्यक्षात ते आजारी पडले आणि त्यांच्यावर आता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

    हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी शरद पवारांची “सिल्वर ओक” या निवासस्थानी जाऊन वीस मिनिटे भेट घेतली. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपा संदर्भात आपली बाजू त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे बोलले जात आहे.

    पवारांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी चर्चा केल्याची ही बातमी आहे. पण या बातमीनंतर पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंवाद हवा, असे भाषण केल्याची बातमी आली आहे. केशव गोरे ट्रस्टच्या मृणाल गोरे दालनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले.

    त्यावेळी त्यांनी मृणाल गोरे यांच्या आठवणी जागविल्या. मृणाल गोरे आमदार असताना सदनात राज्याच्या हिताविषयी चर्चा चालत असत. पण आता कोथळा काढण्याची भाषा वापरली जात आहे, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली आहे.

    पवारांनी नेमलेले राष्ट्रवादीचे मंत्री एकापाठोपाठ एक आर्थिक घोटाळ्यांमध्ये अडकले जात आहेत आणि पवारांची पवारांच्या मुलाखती आणि भाषणे सुरू आहेत, असे चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे.

    sharad pawar talks of conciliatry politics, but his ministers anil deshmukh and hasan mushrif are in the dock of money laundring issues

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ