• Download App
    मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर शरद पवारांना आजही "शंका"; ठाकरे - पवार सरकारच्या काळात आरक्षण रद्द झाल्याचा फडणवीसांवरच ठेवला "ठपका"!!|Sharad Pawar still has "doubts" about Maratha reservation staying in court; Fadnavis was "blamed" for cancellation of reservation during the Thackeray-Pawar government!!

    मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर शरद पवारांना आजही “शंका”; ठाकरे – पवार सरकारच्या काळात आरक्षण रद्द झाल्याचा फडणवीसांवरच ठेवला “ठपका”!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाने एकमुखाने दिलेले मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर मात्र शरद पवारांना आजही शंका आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात आरक्षण दिले होते, ते हायकोर्टापर्यंत टिकले, परंतु नंतर ठाकरे – पवार सरकारच्या काळात ते सुप्रीम कोर्टात टिकू शकले नाही. मात्र त्याचा ठपका शरद पवारांनी चलाखीने देवेंद्र फडणवीसांवरच ठेवला Sharad Pawar still has “doubts” about Maratha reservation staying in court; Fadnavis was “blamed” for cancellation of reservation during the Thackeray-Pawar government!!



    महाराष्ट्र विधिमंडळाने आज विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले. मराठा समाजात त्याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटली. छत्रपती संभाजी राजे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचे स्वागत केले. विधिमंडळात आरक्षण विधेयक संमत झाल्यानंतर सुरुवातीला मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाचे स्वागत केले, पण नंतर मात्र त्यांनी ते आरक्षण नाकारले. हाताला लावलेले सलाईन काढून टाकत त्यांनी डॉक्टरी उपचार घेण्याचेही नाकारले. सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर त्यांनी आपली जुनीच भूमिका पुन्हा उचलून धरली.

    या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मराठा आरक्षण कोर्टात टिकण्याबद्दल शंका व्यक्त केली. शरद पवार म्हणाले, की आमचे सरकार (काँग्रेस – राष्ट्रवादी) असताना ते उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे होऊ शकले नाही, नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ते मंजूर झाले. उच्च न्यायालयात ते टिकले, पण सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळले. (मात्र सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार नव्हते, तर ठाकरे – पवारांचे सरकार होते, हे शरद पवारांनी सोयीस्कररित्या आपल्या वक्तव्यातून वगळले.)

    यावेळीही तोच मसुदा विधानसभेत सर्वांनी एकमताने मंजूर केला. तो मंजूर झाला, आता सर्वोच्च न्यायालयात काय होणार हे पाहावे लागेल. त्यामुळे आज आम्ही यावर काहीही बोलू शकत नाही, न्यायालयाचे पूर्वीचे निर्णय अनुकूल नाहीत, असा इशारा शरद पवारांनी दिला शरद पवारांच्या आजच्या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणातल्या झारीतले शुक्राचार्य नेमके कोण??, हे समोर आल्याची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

    Sharad Pawar still has “doubts” about Maratha reservation staying in court; Fadnavis was “blamed” for cancellation of reservation during the Thackeray-Pawar government!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस