• Download App
    sharad pawar so called safe game dilip valse patil name on forefront for home ministership

    अनिल देशमुखांची विकेट पडल्यानंतरही शरद पवारांच्या “सेफ गेम”ची मराठी माध्यमांमध्ये चर्चा; गृहमंत्रीपदासाठी वळसे पाटलांचे नाव पुढे!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई  : महाराष्ट्रातल्या १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांची राजकीय विकेट वाचविण्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला अपयश आले. तरी देखील गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे पाटलांचे नाव पुढे करून शरद पवार हे सेफ गेम खेळतील, अशी चर्चा मराठी माध्यमांनी सुरू केली आहे.sharad pawar so called safe game dilip valse patil name on forefront for home ministership

    अनिल देशमुखांच्या राजीनामा पत्रात जरी नैतिकतेची भाषा असली, तरी सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेणे शरद पवारांना भाग पडले. शिवाय आता सीबीआयच्या टीमपुढे अनिल देशमुख कोणाची नावे घेणार…



    १०० कोटींच्या खंडणीखोरीच्या लपेट्यात कोण येणार अशी टांगती तलवार असताना त्याची चर्चा करण्याऐवजी पवारांच्या सेफ गेमची चर्चा सुरू करून पवारांची मीडिया इकोसिस्टिम कार्यरत झाल्याची झलक मराठी माध्यमांनी दाखविली आहे.

    दिलीप वळसेंवर माध्यमांची स्तुतिसुमने

    पवार हे सेफ गेम म्हणून दिलीप वळसे पाटील यांचे गृहमंत्री म्हणून पुढे करण्याची जोरदार चर्चा आहे. दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

    शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमलेलं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार आणि पक्षाकडून सुरू असल्याची माहिती आहे.

    वळसे – अजित पवार सुप्त संघर्षाचे काय…

    यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. राष्ट्रवादीसाठी ते कायमच संकटमोचक ठरले. ते दिलीप वळसे पाटील हेच सध्या गृहमंत्रिपदासाठी योग्य पर्याय ठरू शकतील,

    असा मतप्रवाह राष्ट्रवादीत निर्माण झाल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले आहे. सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकारबरोबरच राष्ट्रवादीची मलीन झालेली प्रतिमा वाचवण्यासाठी शरद पवार यांच्याकडून वळसेंचे नाव पुढे येतेय, असे मराठी माध्यमांचे म्हणणे आहे.

    पण त्यावेळी अजित पवारांशी झालेल्या सत्तास्पर्धेतून वळसे पाटलांना उपमुख्यमंत्रीपदाऐवजी विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले होते, याकडे मराठी माध्यमांनी बातम्या देताना सोयिस्कर दुर्लक्ष केले आहे.

    sharad pawar so called safe game dilip valse patil name on forefront for home ministership

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!