• Download App
    Sharad Pawar पवारांची अवस्था 1986 पेक्षा बिकट; "पॉलिटिकल डिमांड" मध्ये मोठी घट!!

    Sharad Pawar : पवारांची अवस्था 1986 पेक्षा बिकट; “पॉलिटिकल डिमांड” मध्ये मोठी घट!!

    नाशिक : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसल्यानंतर गेल्या महिनाभरामध्ये पवार काका – पुतणे एकत्र येणार ही जी चर्चा सुरू आहे, त्याचे वेगवेगळे अर्थ आणि मायने लोकांनी काढले आहेत. यातला एक अर्थ शरद पवार अजित पवारांच्या पक्षांमध्ये आपला पक्ष विलीन करून सत्तेच्या वळचणीला जाणार असा आहे. काका आणि पुतळ्यांच्या एकत्रीकरणाची भाषा जरी कौटुंबिक ऐक्याची असली, तरी प्रत्यक्षात परिणाम मात्र सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्याचा होणार आहे.

    पण त्या पलीकडे जाऊन काका – पुतण्यांच्या पक्षांच्या एकत्रीकरणाचा अर्थ सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व स्वतंत्रपणे उभे राहू शकले नाही, हा देखील आहे. कारण जर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत जिंकली असती, तर अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार किंवा अजितदादांच्या कडचे सगळे नेते शरद पवारांकडे वापस जाणार, अशी चर्चा रंगली असती किंबहुना तशी चर्चा रंगत असताना प्रत्यक्षात तशी राजकीय घडामोडी घडवून आत्तापर्यंत अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस खाली देखील झाली असती. खुद्द अजित पवारांना सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्यापुढे शरणागती पत्करावी लागली असती.

    पण विधानसभेचे निकाल उलटे लागल्यानंतर चर्चेची गंगा देखील तशीच उलटी वाहू लागली. पण या चर्चेचा आणखी देखील एक गंभीर अर्थ आहे, तो म्हणजे शरद पवारांच्या उतारवयामध्ये त्यांची “पॉलिटिकल डिमांड” घटली आहे. यासाठी 1980 ते 1986 या 6 वर्षांच्या कालावधीतल्या त्यांच्या राजकारणाचा चढता आलेखाची साक्ष पुरेशी आहे. त्यावेळी शरद पवार तरुण होते. महाराष्ट्रातले ते एक प्रमुख नेते बनले होते. 1978 ते 1980 अशी दोन वर्षे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करून देखील झाले होते. त्यामुळे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या संपूर्ण प्रभावातल्या काँग्रेस पक्षामध्ये शरद पवारांविषयी एक विशिष्ट आस्था होती. शरद पवारांची ताकद काँग्रेसला मिळाली, तर काँग्रेस महाराष्ट्रात घट्ट पाय रोवून उभी राहू शकेल, असे इंदिरा गांधी आणि राजीव गांधींना देखील वाटत होते. पण पवार इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसमध्ये गेले नव्हते.


    Supriya sule : पवारांचा पक्ष अजितदादांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणाची चर्चा, याचा अर्थ सुप्रिया सुळेंचे स्वतंत्र नेतृत्व उभंच राहीना!


    1986 मध्ये मात्र विरोधी पक्षांमध्ये बसणे फारसे लाभदायक ठरणार नाही. कारण राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली आता काँग्रेसला संपूर्ण देशभर प्रचंड पाठिंबा मिळाला, हे पवारांच्या लक्षात आले. त्यांनी राजीव गांधींच्या संमतीने त्यावेळची आपली समाजवादी काँग्रेस औरंगाबाद मध्ये कार्यक्रम घेऊन काँग्रेसमध्ये विलीन करून टाकली होती. पवारांना त्यावेळी काँग्रेसमध्ये मोठी डिमांड होती. राजीव गांधींनी काँग्रेसमध्ये त्यांचे स्वागत केले होते. 1988 मध्ये त्यांना मुख्यमंत्री केले होते.

    काँग्रेस – पवारांना एकमेकांचा उपयोग नाही

    2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील शरद पवार दीर्घकालीन राजकीय पर्याय म्हणून आणि सुप्रिया सुळे यांचे “पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट” म्हणून काँग्रेसमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करतील, अशी चर्चा होती. यासाठी पवार स्वतःच्या “टर्म्स अँड कंडिशन्स” काँग्रेसला स्वीकारणे भाग पाडतील, असेही त्यावेळी बोलले जात होते. पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल एवढे विपरीत लागले की, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये विलीनीकरणाची चर्चाच लुप्तप्राय झाली. त्याउलट पवार कुटुंबीयांमधले मतभेद मिटून काका – पुतणे एक होणार का??, या चर्चेच्या आवरणाखाली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच प्रादेशिक पक्षामध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. हीच पवारांची “पॉलिटिकल डिमांड” घटल्याची “हिंट” ठरली. पवारांना आता ना काँग्रेस बोलावते आहे, ना पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या मनःस्थितीत किंवा राजकीय स्थितीत उरले आहेत. कारण आज काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एक झाली तरीदेखील त्यांची आमदार संख्या 16 + 10 = 26 होणार आहे. त्यामुळे पवारांचा ना काँग्रेसला उपयोग आहे, ना काँग्रेसचा पवारांना उपयोग आहे. महाराष्ट्रातली पवारांची “पॉलिटिकल डिमांड” घटवून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा पक्ष पुतण्याच्या प्रादेशिक पक्षात विलीन करायचा पर्याय खुला करून दिला आहे.

    Sharad Pawar situation is worse than in 1986

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस