• Download App
    पवारांनी बोलघेवडेपणा करण्यापेक्षा राष्ट्रवादीची सावरकर सन्मान यात्रा काढावी; आशिष शेलारांचे आव्हान|Sharad Pawar should not only talk of savarkar honour, but draw NCP savarkar sanman yatra, challenges ashish shelar

    पवारांनी बोलघेवडेपणा करण्यापेक्षा राष्ट्रवादीची सावरकर सन्मान यात्रा काढावी; आशिष शेलारांचे आव्हान

    प्रतिनिधी

    मुंबई : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सुनावले. वीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली आहे. वीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा संबंध नाही. ते विज्ञानवादी होते. त्यामुळे वीर सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवने योग्य नाही, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर बोलताना भाजप आमदार आशिष शेलार यांनी शरद पवारांना एक आव्हान दिले आहे.Sharad Pawar should not only talk of savarkar honour, but draw NCP savarkar sanman yatra, challenges ashish shelar



    केवळ बोलघेवडेपणा करू नये

    मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आशिष शेलार म्हणाले की, ‘वीर सावरकर हा काही पक्षाचा विषय नाही. वीर सावरकर हा देशाचा विषय आहे. वीर सावरकर हा देशभक्तीचा विषय आहे. वीर सावरकर हा देशभक्तीचे जाज्वल्य जगवणारा आणि जगण्याचा विषय आहे. त्यामुळे वीर सावरकरांच्या मुद्द्यावरच राजकारण भाजपला मान्य नाही. शरद पवारांना वीर सावरकरांची बदनामी करणे योग्य वाटत नसेल. तर त्यांनी वीर सावरकर या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे त्यांचा गौरव कार्यक्रम, सन्मान उल्लेख कार्यक्रम किंवा त्यांची गौरव यात्रा काढावी. केवळ बोलघेवडेपणा करू नये. अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे.’

     मुंबईत ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये वीर सावरकर गौरव यात्रा

    दरम्यान मुंबईतील ३६ विधानसभांमध्ये येत्या पाच दिवसांत वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपटाचे देखावे, गीते, त्यांचे विचार याचे विविध चित्ररथ तयार करून ही यात्रा काढण्यात येणार आहे. जे सावरकर भक्त आहेत त्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आशिष शेलार यांनी केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी केवळ भाषणांध्ये वीर सावरकर प्रेम दाखवण्यापेक्षा या वीर सावरकर गौरव यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहनही शेलार यांनी केले.

    Sharad Pawar should not only talk of savarkar honour, but draw NCP savarkar sanman yatra, challenges ashish shelar

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस