Assembly Speaker : पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा यक्षप्रश्न आघाडी सरकारसमोर आहे. पाच व सहा जुलैदरम्यान पावसाळी अधिवेशन होऊ घातलं आहे. परंतु विधानसभा अध्यक्षपद रिक्त असल्याने भाजपने थेट राज्यपालांकडे धाव घेऊन, तातडीने अध्यक्षांची निवडीची मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसकडून ही निवड याच अधिवेशनात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल आणि याच अधिवेशनात निवड होईल अशी माहिती दिली. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. Sharad Pawar Says Three Parties Should Decide Assembly Speaker
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा यक्षप्रश्न आघाडी सरकारसमोर आहे. पाच व सहा जुलैदरम्यान पावसाळी अधिवेशन होऊ घातलं आहे. परंतु विधानसभा अध्यक्षपद रिक्त असल्याने भाजपने थेट राज्यपालांकडे धाव घेऊन, तातडीने अध्यक्षांची निवडीची मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसकडून ही निवड याच अधिवेशनात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल आणि याच अधिवेशनात निवड होईल अशी माहिती दिली. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. निवडणूक घेण्याबाबत तिन्ही पक्षांनी एकत्रित निर्णय घ्यावा. काँग्रेसने त्यांचा उमेदवार ठरवावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ.
ज्यावेळी आम्ही सरकार बनवलं, त्यावेळी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचं ठरलं. ती जागा काँग्रेसची आहे. निवडणूक घ्यायची असेल तर तिन्ही पक्षांनी निर्णय घ्यावा, काँग्रेस देईल तो निर्णय निवडावा, असंही शरद पवार म्हणाले.
दरम्यान, बाळासाहेब थोरात म्हणाले होते की, विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि काँग्रेसचा अध्यक्ष असेल. हे सरकार भक्कम आहे. दोन वर्षे सरकार चाललं आहे, पुढच्या काळातही सरकार चांगल्या पद्धतीने चालेल, महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत, असंही ते म्हणाले होते.
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून पुण्याचे आमदार संग्राम थोपटे व मुंबईचे आमदार अमिन पटेल यांची नावे आघाडीवर आहेत. परंतु अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे अद्याप स्पष्ट नाही.
Sharad Pawar Says Three Parties Should Decide Assembly Speaker
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- ‘ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवतो, 10 हजारांची फौज आणतो’
- पुणे हादरलं! नवविवाहित डॉक्टर दांपत्याची आत्महत्या, आधी पत्नीने, दुसऱ्या दिवशी पतीने घेतला गळफास
- कृषी कायदे पूर्णपणे रद्द करण्याच्या बाजूने नाहीत शरद पवार, म्हणाले – आक्षेप असलेल्या भागात सुधारणा व्हावी!
- अंमलबजावणी संचालनालयाचे प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसलेंना समन्स, मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- ‘राजभवनात पहाटेची लगबग सुरू होईल असे वाटत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच’, भाजपवर शिवसेनेची चौफेर टीका