प्रतिनिधी
नवी दिल्ली : जरा सेन्सिबल प्रश्न विचारा, असे पत्रकारांना सुनावत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. या बंडातून जर महाराष्ट्रातील सरकार पडले, तर आम्ही विरोधी बाकातही बसू शकतो, असे सूचक विधान त्यांनी केले. Sharad Pawar says, if government falls will sit in the opposition
सरकार पाडण्याचा हा तिसरा प्रयत्न
मागील अडीच वर्षापासूनचा सरकार पडण्याचा हा तिसरा प्रयत्न आहे. जेव्हा आमचे सरकार स्थापन होणार होते तेव्हा आमच्या काही आमदारांना हरियाणात घेऊन गेले होते, नंतर ते पुन्हा आले. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोट्यातील सगळी मते आमच्या उमेदवाराला मिळाली. आमच्या आघाडीतील एक उमेदवार जिंकू शकला नाही, हे सत्य आहे. त्याविषयी आम्ही आघाडीतील नेते बसून चर्चा करू, असेही पवार म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस मतदान होत असते आणि सरकार पुढे चालत असते. क्रॉस मतदान होते जेव्हा व्यक्तिगत संपर्कातून हे होत असते. १९८०मध्ये माझ्याकडे फक्त ६ मते होती त्यानंतर आम्ही ४५ मते मिळवून आमचा उमेदवार राज्यसभेत निवडून आणला होता.
– शिवसेनेची गाईडलाईन हवी
राज्यातील स्थिती पाहिल्यावर यातून काही तरी उपाय निघेल असा विश्वास आहे. एकनाथ शिंदे यांनी कधी त्यांना मुख्यमंत्री बनवा असे कधी सांगितले नव्हते. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिवसेनेकडे आहे, उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे आहे. मुखमंत्रीपदाबाबत काही बदल करायचा विषय उद्धव ठाकरेंचा आहे. आमचा त्यांना पाठिंबा आहे. या घडामोडीत उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. त्यांची चर्चा झाल्यावर आम्ही त्यांच्याशी बोलू. हा विषय शिवसेनेचा अंतर्गत आहे. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही, ते आमदार कुठे थांबले आहेत हेही मला माहिती नाही. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्र आहोतच आहे मात्र या विषयात जोवर शिवसेनेची गाईडलाईन मिळत नाही तोवर काही निर्णय घेता येणार नाही.
Sharad Pawar says, if government falls will sit in the opposition
महत्वाच्या बातम्या
- विधान परिषद निवडणूक : इंदिराजी – राजीवजींच्या काळातले “द्रष्टेपण” 2022 मध्ये सिद्ध!!
- महाविकास आघाडीत असंतोषाचा स्फोट; भाजपला विधानसभेत 134 आमदारांचे मताधिक्य!!
- विधान परिषद निवडणूक : फडणवीसांची चाणक्यगिरी; तिघांचे भांडण एकाचा लाभ!!
- विधान परिषद : महाविकास आघाडीला फडणवीसांचा पुन्हा धोबीपछाड; काँग्रेसचे भाई जगताप पराभूत भाजपचे प्रसाद लाड विजयी!!